तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे नगरमध्ये आगमन
अहमदनगर । दर्शक :
सबजेल चौकातील पलंगे कुटुंब मानकरी असलेल्या व सुमारे ८०० वर्षाची परंपरा असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे आगमन नगर शहरात बोल्हेगाव,केडगाव, निबळक मार्गे भूतकरवाडीतील ताठे मळ्यात आगमन झाले असून आज नगरमधील पहिला पहिला मुक्काम त्याच्याच येथे होणार आहे.
उद्या दुसऱ्या दिवशी पलंग भूतकरवाडी,बालिकाश्रम रोड,गायकवाड कॉलनी हडको कॉलनी येथे दुपारी थांबून पुढे तारकपूर,लालटाकी,दिल्लीगेट येथे फिरून नालेगाव येथील नवग्रह मंदिरात मुक्कामी राहणार आहे, दि ३ रोजी शहरातील तोफखाना, चितळेरोड भागात फिरून सबजेल चौकातील तुळजाभवानी मंदिरात थांबणार आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com