Home Guard | नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी ४ ऑक्टोबर रोजी कागदपत्रांसह उपस्थित राहावे
अहमदनगर दि. २- जिल्हा होमगार्ड मधील नवीन होमगार्ड सदस्य नोंदणीची तात्पुरत्या अंतिम यादीतील अहमदनगर तालुका पथकामधील लक्षसंख्येमध्ये अंशतः बदल करुन सुधारित तात्पुरती अंतिम यादी अहमदनगर जिल्हा होमगार्ड कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.
नोंदणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवांरानी दिनांक ४ ऑक्टोबर,२०२४ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा होमगार्ड कार्यालय, सिद्धी बागेजवळ अहमदनगर येथे वैद्यकीय प्रमाणपत्र, नोंदणीच्या वेळी दिलेल्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह उपस्थित राहावे. नमूद तारखेस जे उमेदवार उपस्थित राहणार नाहीत त्यांचे नांव पात्रता निवड यादीमधून कमी करण्यात येईल, असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी कळविले आहे.
*******

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com