Bolhegao | ११ कोटींच्या विकासकामांमुळे अक्षय कातोरे यांना प्रभाग ८ मधून उतरवण्याची नागरिकांची मागणी
नगर–नागापूर परिसरात आयोजित मेळाव्यात हजारो नागरिकांनी शिवसेना (शिंदे गट) युवा सेनेचे जिल्हाप्रमुख अक्षय उर्फ आकाश कातोरे यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून उमेदवार म्हणून मैदानात उतरावे, अशी मागणी केली. राघवेंद्र स्वामी मंदिर प्रांगणात पार पडलेल्या या मेळाव्यास तीन ते चार हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते, ज्यामध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून बोल्हेगाव–नागापूर परिसरासाठी ११ कोटींचा विकासनिधी मिळवण्यात आला असून या निधीतून परिसरातील अनेक कामांना गती मिळाली आहे.
या कामांमध्ये अनेक वर्षांपासून रखडलेल्या गणेश चौक–बोल्हेगाव आणि गणेश चौक–आंबेडकर चौक रस्त्यांचा समावेश आहे. आंदोलने व रास्ता रोको झाल्यानंतरही प्रलंबित असलेले हे रस्ते निधी उपलब्ध झाल्यानंतर सुसज्जरित्या पूर्ण करण्यात आल्याचे नागरिकांनी नमूद केले.
विकासकामांमुळे परिसरात ओळख निर्माण झाल्याने अक्षय कातोरे यांना ‘बोल्हेगाव विकासाचे जनक’ म्हणून संबोधले जात असल्याचेही या वेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. मेळाव्यात शिवसेनेचा भगवा झेंडा प्रभाग क्रमांक ८ मध्ये पुन्हा फडकताना पाहण्यासाठी नागरिकांनी उत्सुकता व्यक्त केली.
या कार्यक्रमाला साहेबराव सप्रे, सुभाष महाराज कातोरे, अजय महाराज बारस्कर, लोभाशेट कातोरे, दशरथ महाराज कातोरे, राधाकिसन महाराज कातोरे, रावसाहेब वाटमोडे, माजी नगरसेवक मदन आढाव, योगेश गलांडे, अंबादास शिंदे, भांडे मामा, मोहनराव कातोरे, शेलार मामा, राहुल सप्रे, गणेश भोर, किशोर सप्रे, भाऊ भोर, पाखरे सर, पंढरीनाथ सप्रे, कांचन इंगवले, गोसावी मावशी यांसह मोठ्या संख्येने नागरिक आणि कातोरे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता.


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com