Railway | नाशिक–पुणे थेट रेल्वे संपर्काला ; नगर–पुणे दुहेरी मार्गाचा ₹8970 कोटींचा DPR तयार

 नाशिक–पुणे थेट रेल्वे संपर्काला ; नगर–पुणे दुहेरी मार्गाचा ₹8970 कोटींचा DPR तयार

नाशिक–पुणे थेट रेल्वे संपर्काला ; नगर–पुणे दुहेरी मार्गाचा ₹8970 कोटींचा DPR तयार





पुणे उच्च-गती रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून मोठी गती मिळाली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत या प्रकल्पाच्या नव्या समायोजित मार्गाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. नाशिक–पुणे दरम्यान जलद, सुरक्षित आणि नियोजित रेल्वे जोडणी उभारण्याचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे.


        या प्रकल्पाच्या योग्य मार्गसंरेखनासाठी केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुदर्शन दिलीपचंद डूंगरवाल यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. वैज्ञानिक, तांत्रिक बाबी लक्षात घेऊन GMRT संवेदनशील पट्टा टाळण्याची मागणी त्यांनी वेळोवेळी केली होती. त्यांच्या सूचनांनी प्रकल्पाला दिशादर्शन मिळाल्याचे अधिकृतरित्या नमूद करण्यात आले आहे.


      राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनिक स्तरावर आवश्यक समन्वय साधत प्रकल्पाला गती देण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. माजी खासदार सुजय विखे यांनी संबंधित मंत्रालयांशी नियमित संवाद साधत मंजुरी, दुरुस्ती आणि तांत्रिक प्रक्रियांना गती दिली. स्थानिक नेतृत्वाच्या या संयुक्त प्रयत्नांमुळे प्रकल्प प्रभावीपणे पुढे सरकला आहे.

Railway | नाशिक–पुणे थेट रेल्वे संपर्काला ; नगर–पुणे दुहेरी मार्गाचा ₹8970 कोटींचा DPR तयार




     पूर्वीचा मार्ग नारायणगावमार्गे GMRT वेधशाळेजवळून जात असल्याने विज्ञान व तंत्रज्ञान विभाग तसेच अणुऊर्जा विभागाने आक्षेप घेतला होता. GMRTच्या संवेदनशील उपकरणांवर परिणाम होऊ शकतो, असे कारण देत हा मार्ग नाकारण्यात आला.

       आता निश्चित झालेला नवा सुधारित मार्ग नाशिक – साईनगर शिर्डी – पुण्तांबा – निम्बळक – अहमदनगर – पुणे (चाकण औद्योगिक वसाहत मार्गे) असा असणार आहे. हा मार्ग GMRTचा संवेदनशील परिसर टाळत अधिक व्यापक क्षेत्रांना जोडणार आहे.

      दरम्यान, विविध टप्प्यांवरील कामे पुढीलप्रमाणे आहेत :
• नाशिक रोड–साईनगर शिर्डी दुहेरीकरणाचा DPR तयार
• शिर्डी–पुण्तांबा (17 किमी) साठी ₹240 कोटी मंजूर
• पुण्तांबा–निंबळक (80 किमी) दुहेरीकरण पूर्ण
• निंबळक–अहिल्यानगर (6 किमी) काम प्रगत
• अहमदनगर–पुणे (133 किमी) दुहेरी मार्गाचा ₹8970 कोटींचा DPR तयार
• चाकण MIDC साठी थेट रेल्वे जोडणी प्रस्तावित


       या प्रकल्पामुळे धार्मिक पर्यटन, औद्योगिक वाढ आणि शैक्षणिक-शहरी विकासाला मोठा वेग मिळणार आहे. शिर्डी, त्र्यंबकेश्वर, पंढरपूर मार्गावरील भाविकांना सुलभ प्रवास उपलब्ध होणार असून चाकण MIDC, ऑटोमोबाईल आणि इंजिनिअरिंग उद्योगांना मोठा लाभ होणार आहे. नाशिक–पुणे विद्यार्थी व कामगार गतिशीलतेतही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.

     प्रधानमंत्री गतीशक्ती अंतर्गत या पट्ट्यात मल्टिमोडल कार्गो टर्मिनल उभारण्याचीही क्षमता असल्याचे नमूद करण्यात आले असून यासाठी संयुक्त समिती स्थापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

    नवा नाशिक–पुणे समायोजित मार्ग महाराष्ट्राच्या औद्योगिक, पर्यटन आणि सर्वांगीण विकासातील ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या