'नगर होतय हायटेक'- मा.खा.डॉ सुजय विखे पाटील
'महा सिक्युरटेक एक्सपो 'च्या उद्घाटन समारंभला नगर कॉम्प्युटर असोसिएशनचे व नगर सीसीटीव्ही असोसिएशन चे तसेच टाईटल स्पॉन्सर - हिकव्हिजन,आर पी टेक, प्रामा व मीडिया पार्टनर - ए.टी.एस सिस्टिम प्रा.ली. ,इनफिल्ड सर्व्हिसेस , फायर अँड सेफ्टी, इंस्पायर कॉम्प्युटर्स, सेक्युरअशिया चे प्रतिनिधी उपस्थित होते.
नगर, नाशिक, संभाजीनगर, बीड, बारामती, दिल्ली, गुजरात, सिल्वासा,आदी शहरांमधून व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित तसेच या वेळी नगर मोबाईल अससोसिएशन चे व संभाजीनगर कॉम्पुटर अससोसिएशन चे प्रतिनिधी तसेच या क्षेत्रातील प्रमुख व्यवसायिक देखील उल्लेखनीय उपस्थति होती.
आर - ईशा सिक्युरटेक प्रा.ली. या कंपनीचे एमडी, सी ई ओ, राहुल मुथा व त्यांचे सर्व प्रतिनिधींनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते या एक्सपोला माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील, खासदार निलेश लंके, नागेबाबा पतसंस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे, सोहम ग्रुपचे एम. डी. अमित बुरा तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींनी यांनी भेट देत अनोख्या प्रदर्शनाचे खूप कौतुक केले. असे इंटरनॅशनल लेव्हल एक्सपो दरवर्षी किमान दोन-तीन दिवस भरवावे अशी अशी इच्छा दर्शवली.
एका छताखाली देश-विदेशातील विविध कंपन्यांची आधुनिक सुरक्षा यंत्रणा आणि असंख्य प्रकारचे सीसीटीव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटर, फायर अलार्म सिस्टीम, डिस्प्ले, सॉफ्टवेअर, ड्रोन, डिजिटल बोर्ड अशा इलेक्ट्रॉनिक सेक्युरिटी सिस्टिम असे बरेच उपकरणाचे आलेल्या नवीन टेक्नॉलॉजीचा एआय तंत्रज्ञान यांचे काम कसे चालते याचे सर्वांना प्रात्यक्षिक व्यवसायिकांना - ग्राहकांना देण्यात आले.मेड इन इंडिया असणाऱ्या प्रॉडक्ट ला जास्तीत जास्त मागणी होती.
' नगर होतय हायटेक '- मा.खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी प्रदर्शनास भेट दिली असता नगर जिल्यात विविध ठिकाणी सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रात प्रशासनाच्या मार्फत बसवण्यात आली असून यामुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागत आहेत तथा ज़िल्हा परिषद मार्फत जिल्यातील जि.प. शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड उपलध्द करून देण्यात आले असून मुलांना डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे याच मुळे नगर जिल्ह्याची हायटेक व डिजिटल होण्यासाठी वाटचाल चालू आहे असे सांगण्यात आले ,





टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com