पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कँडल मार्च
नगर-जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला.त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अहिल्यानगर मधील सावेडीतील मोतोश्री प्रतिष्ठानच्या वतीने वसंत टेकडी,स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग परिसरातून कँडल मार्च काढण्यात आला व जे मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले,अशोक दहिफळे,सुरेश शिरसागर,दीपक थाडे, नितीन थाडे,विनय वाखुरे,स्मिता राजन स्मिता बिजू,राणी रोकडे,सुमा नायर,सती लंबोधरी,डॉक्टर सेदु काम्बलत,मंजू थाडे,ऐश्वर्या खाडे यांच्यासह स्पोर्ट्स क्लबचे लहान मुले परिसरातील महिला व पुरुष वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.
या वेदनादायक दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतीप्रित्यर्थ सर्वत्र लोक मेणबत्ती मार्च काढत आहेत.अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २८ जणांचा मृत्यू झाला होता.या कॅन्डल मार्चद्वारे आम्ही दहशतवादाविरु
यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व श्रधान्जली वाहिली यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती
x

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com