पहलगामच्या हत्याकांडातील पर्यटकांना कामगारांनी वाहिली श्रद्धांजली
नगर-येथील एमआयडीसीतील किर्लोस्कर फेरस कंपनीमध्ये आज शिवसेना व जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे आतंकवादी नी एकेकाला नाव विचारून तब्बल 28 लोकांना गोळ्या घालून ठार करतात.अंदाधुंद फायरिंग करून अनेकांना जखमी केले त्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली व पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या
यावेळी जिल्हा शिवसेना प्रमुख व संघटनेचे अध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, सुरेख क्षीरसागर ,युनिट अध्यक्ष राजेंद्र वाकळे,राजेंद्र पाटील, कचरू ढगे,संजय शिरसाठ,जलील शेख,कानिफनाथ घाडगे,व्यवस्थापन प्रतिनिधी प्लांट हेड चैतन्य शिंदे,आशिष कुलश्रेष्ठ,कैलास गुरव,रोहित धाडगे,श्री तोरणे या अधिकारी वर्गासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबुशेठ टायरवाले म्हणाले काश्मीर पाच वर्षे शांत होते तिथे निवडणूक झाली व सरकार सत्तेवर आल्यानंतर अतिरेक्यांनी डोके वर काढले त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी काश्मीर व पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी.
कारण या दोन्ही ठिकाणी हिंदू वर अत्याचार होत असून त्यांचे खून पडत आहे हे सर्व स्थानिक सहकार्यांशिवाय शक्य नाही. गुजरात,राजस्थान,पंजाब मध्ये पाकिस्तान बॉर्डर आहे तिथे काही होत नाही. पण काश्मीरमध्ये स्थानिक नागरिक मदत करतात म्हणून हे शक्य होते.सरकार आपले असूनही हिंदूंनी किती दिवस मार खायचा ,मृत्यूमुखी पडयचे यासाठी सरकारने कडक पावले उचलून पाकिस्तानशी युद्ध तरी छेडावे असेही ते म्हणाले
यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व श्रद्धांजली वाहिली सभेनंतर कामगारांनी पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला
.webp)

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com