जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत २३४ शाळांचा सहभाग,पारितोषिक वितरण संपन्न
नगर : दर्शक
आमदार सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वाभिमानी शिक्षक, शिक्षकेतर संघटना आणि रायझिंग ट्रायबल फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला जिल्हाभरातून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील एकूण २३४ शाळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण पेमराज सारडा महाविद्यालयात पार पडला.विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर,संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे,
जिल्हा मुख्याध्यापक सेल अध्यक्ष अमोल क्षीरसागर,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गवते,वैभव सांगळे,गावडे सर,अरुण पवार,शिंदे सर,गाडेकर सर, नारायण अनभुले,विजय साळवे,ललित वाकचौरे,राहुल मोरे,रिबेका क्षेत्रे,अनिता साठे,बंडू गाडेकर आदी मान्यवरांसह विद्यार्थी, पालक,शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा व व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.सत्यजित तांबे यांची प्रेरणा घेऊन शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न सोडविण्याचे व शैक्षणिक उपक्रम राबवण्याचे कार्य संघटनेतर्फे सातत्याने केले जात असल्याचे प्रसाद शिंदे यांनी सांगितले.
कार्यक्रमावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
.webp)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com