Brahman Samaj | आद्य शंकराचार्य जयंती निमित्त सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजन
नगर - ब्राह्मण सेवा संघ, केडगाव हा गेली 23 वर्षापासून सामुदायिक व्रतबंध आयोजीत करत आहे. यावर्षी दिनांक 2 मे 2025 आद्य शंकराचार्य जयंती या शुभ दिनी छत्रपती शिवाजी मंगल कार्यालय, अंबिका नगर, केडगाव येथे सामुदायिक व्रतबंध सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. सोहळ्याचे पौरहीत्य श्री पंढरपूरकर गुरुजी करतील.
अत्यंत अल्प वर्गणीत अल्पोपहार, भोजन व संस्कार विधीस लागणारा खर्च संघातर्फे केला जातो. ज्या बटूंच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असेल त्या बटूंची मुंज मोफत/सवलतीच्या शुल्कात लावण्यात येते.
ज्या समाजामध्ये मुंज विधी केला जातो. त्या सर्व समाज बांधवांना यामध्ये सहभागी होता येते .सर्व समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे संघाचे अध्यक्ष नंदकुमार पोळ यांनी सांगितले.
नोंदणीसाठी नंदकुमार पोळ (मो.7875500056), किरण खुर्जेकर (मो.9011085153), नंदकुमार कुलकर्णी (मो.9422838467), पंकज जहागीरदार (मो.9028875559) विनायक कुलकर्णी (मो.9552587925) आनंद ठिपसे (मो.9604774423), ज्ञानेश देशपांडे (मो. 9226361357) यांच्या संपर्क साधावा.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com