Andolan PWD | निबोडी-दरेवाडी रस्ताचे कामासाठी उपोषण व ढोल बजाओ आंदोलन
नगर : दर्शक |
येथील कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर आज दिनांक २९ एप्रिल रोजी सरपंच स्वाती सुभाष बेरड यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी निबोडी-दरेवाडी रस्ता
पंधरा दिवसापूर्वी निबोडी, दरेवाड़ी उक्कडगाव,नारायणडोहो हा रस्ता(प्र जिमा १६७)मजबुतीकरण तसेच डांबरीकरण करणे बाबत ग्रामपंचायत कार्यालय,दरेवाडीच्या वतीने सरपंच स्वाती सुभाष बेरड यांनी कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,अहिल्यानगर यांना पत्र देऊन मागणी केली होती जर १० दिवसात हा रस्ताचे काम मार्गी लागले नाही तर संबंधीत सर्व गावातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला होता तरीही या रस्त्याचे अर्धवट काम ठेकेदाराने सुरु न केल्याने आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी सरपंच स्वाती बेरड,ज्येष्ठ नेते सुभाष बेरड,आकांक्षा भिंगारदिवे,निखिल बेरड,बाबा वीर,श्रीकांत जगताप,एकनाथ ससे,सोमनाथ बेरड,शिवाजी बेरड,बद्रीनाथ बेरड,मच्छिंद्र बेरड,प्रकाश पोटे,तेजस कराळे,बाळा गवळी,अशोक जगताप,रवी बेरड,सुनील बेरड आदिसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दरेवाडी ता.नगर येथील निबोडी, दरेवाड़ी उक्कडगाव, नारायणडोहो हा रस्ता मजबुतीकरण करणे तसेच डांबरीकरण करण्याचे काम अर्धे अधिक झालेले आहे. राहिलेला रस्ता खूप खराब आहे.यासाठी वेळोवेळी कार्यालयाशी संपर्क साधून तोंडी सांगितले आहे तरी याकामी लक्ष दिले गेले नाही म्हणून आंदोलन करण्यात आले.
दुपारी नगर तालुका उपअभियंता श्री सुतार यांनी ५ मे पर्यंत काम सुरु करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यावर दुपारी आंदोलन स्थगित करण्यात आले जर ५ मी ला काम सुरु झाले नाही तर दि ६ मे यापेक्षा तीव्र आंदोलन करू असे सरपंच स्वाती सुभाष बेरड यांनी सांगितले

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com