Brahman Samaj | ब्राम्हण सेवा संघ केडगाव तर्फे सामुदायिक व्रतबंध मोठ्या थाटामाटात साजरा
Brahman Samaj |
नगर : दर्शक । केडगाव येथील ब्राह्मण सेवा संघातर्फे सामुदायिक व्रतबंध सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये बारा बटूंच्या मुंजी लावण्यात आल्या. गेल्या 27 वर्षापासून ब्राह्मण सेवा संघ केडगाव विविध उपक्रम आयोजित करत असतो. त्यातीलच 27 वर्षापासून सामुदायिक व्रतबंध सोहळा हा मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो. या सोहळ्यामध्ये अहमदनगर शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील बटू हे उपनयन संस्कारासाठी केडगाव येथे येत असतात. या संपूर्ण सोहळ्याचे पौराहित्य वेदगुणसंपन्न श्री पंढरपूरकर गुरुजी यांनी केले.
बटूंना आशीर्वाद देण्यासाठी श्रीराम भक्त श्री मंदार बुवा रामदासी यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी बटूंना आशीर्वाद देताना उपनयन संस्काराचा अर्थ आणि सध्याच्या काळात हिंदू धर्मीयांनी या आपले स्वसंरक्षण कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले.
सकाळी सहा वाजता सुरू झालेला हा सोहळा यामध्ये उपनयन विधी म्हणजे काय सर्व बटूंचे चौल ,मातृभोजन तसेच भव्य मिरवणूक आणि संपूर्ण विधी पार पाडले. अशी माहिती ब्राह्मण सेवा संघ केडगाव चे अध्यक्ष श्री नंदकुमार पोळ यांनी दिली.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी ब्राह्मण सेवा संघाचे उपाध्यक्ष श्री किरण खुर्जेकर, सचिव श्री पंकज जहागीरदार खजिनदार ,श्री आनंद ठिपसे, सहसचिव ज्ञानेश देशपांडे तसेच महेश कुलकर्णी, अजित कुलकर्णी ,नंदकुमार कुलकर्णी ,विनायक कुलकर्णी, डॉक्टर सुधीर कुलकर्णी, श्री किरण कुलकर्णी , डॉक्टर श्रीकृष्ण जोशी ,श्री राजेश कळसे ,श्री संजय शास्त्री, श्री भूषण पांडव, श्री रविकिरण देशपांडे आणि सर्व महिला सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com