डॉ. पाऊलबुद्धे महाविद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे यांचा सेवापूर्ती सन्मान
Dr.Paulbudhe College | नगर : दर्शक । विश्रांती निषिद्ध आहे, असे महात्मा गांधींनी सांगितले. त्याप्रमाणे सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे सर्वांचे प्रेरणास्थान असणारे स्व. डॉ. नाथ पाऊलबुद्धे यांनी शिक्षणाच्या प्रचारासाठी अविश्रांतपणे काम केले. त्यांची प्रेरणा घेऊन या संस्थेचे संचालक, शाळेतील सर्व शिक्षक स्वतःला झोकून देत काम करतात त्यामुळेच ही संस्था नावारूपाला आली. शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळे या विद्यालयातील असंख्य विद्यार्थी उच्च पदावर कार्यारत झाले. त्यांनी स्वतःचे नाव उंचावुन शाळेचे देखील नावलौकिक वाढविले. शिक्षकांचे खरे समाधान हे विद्यार्थ्यांच्या यशात असते, असे प्रतिपादन संस्थेचे सह सचिव रामकिसन देशमुख यांनी केले.
नगर येथील डॉ. ना.ज. पाऊलबुद्धे माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे प्राचार्य भरत बिडवे यांचा सेवापूर्ती निमित्त संस्था व शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सेवा शिक्षक प्रसारक मंडळाचे सह सचिव रामकिसन देशमुख, खजिनदार प्रा. दादासाहेब भोईटे, बाळकृष्ण सिद्दम, रघुनाथ कारमपुरी, शैक्षणिक संकुल प्रमुख डॉ.रेखाराणी खुराणा तसेच सर्व युनिटचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद उपस्थित होते.
श्री देशमुख म्हणाले संस्था उभारणीपासून भरत बिडवे हे स्व.डॉ.नाथ पाऊलबुद्धे यांच्याबरोबर काम करीत होते. त्यांच्या कामाची पद्धत, घेतलेल्या अनुभवामुळे बिडवे सरांनी देखील आपली शाळा म्हणून काम करताना थोडा देखील अभिमान बाळगला नाही. मुख्यध्यापक असताना ज्यावेळी शाळेचे बांधकाम सुरू होते त्यावेळभ बांधकामावर पाणी मारायला ते स्वतःहून पुढे येत. खेळाचे मैदानाची सुद्धा साफसफाई करताना ते मागेपुढे पाहत नव्हते. अण्णांच्या कार्याचा वसा ते जोपासत, आज जरी ते सेवानिवृत्त झाले तरीही संस्थेकरीता त्यांचे काम सुरू राहणार, असे मला वाटते.
संस्थेचे खजिनदार दादा भोईटे, डॉ, रेखाराणी खुराणा, प्रा.आशा गावडे आदिंसह अनेकांनी आपल्या मनोगता मधून सरांबरोबर काम करताना आलेल्या गोड आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना भरत बिडवे म्हणाले की, मी शासकीय कागदोपत्री शाळेतून सेवानिवृत्त झालो,
आपला सहवास नसणार, पण तुमच्या सोबत मी असणार, तुम्ही फक्त सेवेतुन मला निरोप दिला. पण नाती कधी तुटणार नाही. गेली तीस वर्षे शिक्षक चार वर्षेप्राचार्य म्हणून काम केले. मला काम करण्याची इतकी सवय झाली आहे, की ती लवकर तुटणार नाही. माझी शाळा, माझे विद्यार्थी, सर्व सहकारी शिक्षक यांना भेटल्याशिवाय मला राहवणार नाही, यापुढेही माझे काम सुरूच ठेवीन असे म्हणताच सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com