Tiranga Rally |  नगरमध्ये सैनिकांच्या समर्थनार्थ  तिरंगा रॅली संपन्न

Tiranga Rally |  नगरमध्ये सैनिकांच्या समर्थनार्थ  तिरंगा रॅली संपन्न


 

        नगर-नगरमध्ये राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने सैनिकांच्या समर्थनार्थ  तिरंगा रॅली संपन्न  मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ऑपरेशन सिंदूर या नावाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैन्याने पाकिस्तान मधील अतिरेक्यांच्या तळावर एअर स्ट्राइक करून नऊ तळ उद्ध्वस्त केले. 



भारतीय सैन्याचे अभिनंदन करणे हे प्रत्येक भारतीयाचे प्रथम कर्तव्यच आहे म्हणूनच नगरकरांच्या मनात देशाबद्दल व सैन्याबद्दल असलेली भावना आणखीन दृढ करण्यासाठी  तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.



       यावेळी  पूर्व नौसैना अधिकारी अनिल जोशीमाजी नौदल अधिकारी राहुल जाधवनौदल अधिकारी संजय पाटेकरमेजर निळकंठ उल्हारेमेजर गोरख पालवेमेजर शिवाजी पालवेभाजप शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर,सचिन पारखीप्रशांत मुथ्था ,



 गोपाळ वर्मा ,  सीए राजेंद्र काळे,  संजय आडोळे, , सुनिल रामदासीभैय्या गंधेदामोदर बठेजा,  धनंजय जाधवपं महेश गुगळेसंजय ढोणे,  अनिल शिंदेसुरेखा कदमशिलाताई शिंदे,  सुरेखा विदयेमयुर बोचुघोळकरण कराळेसंपत नलावडेकैलास गर्जेज्ञानेश्वर धिरडे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व महिला मुले उपस्थित होते.



        स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीस प्रारंभ झाला. सावरकर चौकचितळे रोडनेता सुभाष चौकतेलीखुंटइमारत कंपनीतील टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कापडबाजार येथे रॅलीची सांगता करण्यात आली. 



या रॅलीत अहिल्या नगर वासीय सहभागी झाले होते. रॅलीत प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा होता. तसेच १० ० फुटी झेंडा हे या रॅलीचे मुख्य आकषण होते.तर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात येत होती