Nagar Music | गुरुवारी 70 ते 90 च्या दशकातील सुरेल गीतांची महफिल

Nagar Music | गुरुवारी 70 ते 90 च्या दशकातील सुरेल गीतांची महफिल




नगर - एड. अमीन धाराणी प्रस्तुत गाता रहे मेरा दिल व स्वरछंद ग्रुपच्या वतीने 70 ते 90 च्या दशकातील सुमधुर गीतांची महफीलचे गुरुवार दिनांक 22 मे 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजता सावेडी येथील माऊली सभागृहात आयोजन करण्यात आले असल्याचे एड. अमीन धारणी यांनी सांगितले.


या महफीलीत संजय भिंगारदिवे,अँड. गुलशन धाराणी, राजकुमार सहदेव, दीपा भालेराव, हेमंत नरसाळे, डॉ. सुरेखा घोडके, चंदर ललवाणी, ज्योती भिंगारदिवे, अर्जुन चौरे, मंदाकिनी पाडगावकर, वंदना जंगम, सोनवणे जी, नीता गडाख, मोनाली बोरुडे, माधुरी सोनटक्के, अंतरकर काका हे गीते सादर करतील तर सुरवातीला अमीत बरवा हे सेक्सोफोन वर गीत सादर करणार आहे. सुत्रसंचालन विजय माळी व सौ. दिपा माळी करणार आहे. सिस्टीम व तांत्रिक सहाय व्यवस्था विजु भोसले व अभिजित कोल्हार यांचे असल्याचे राजकुमार गुरनानी यांनी सांगितले.


या कार्यक्रमात शहरातील काही सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या अगोदर रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आली आहे. 

कार्यक्रमासाठी नागेबाबा मल्टीस्टेट, साहील वे ब्रिज, डीसीबी बँक, एकझारकी, सेलिंग किचन, विश्व एक्वा आदींचे सहकार्य लाभले आहे. 

सर्वांना मोफत प्रवेश असून कार्यक्रम वेळ सुरू होईल. तरी रसिकांनी वेळेवर उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन सौ. संध्या मेढे यांनी केले आहे.