Nalegao Dindi Nimblak | नालेगाव येथे हरिहर महाराज दिंडी सोहळ्याचे स्वागत
Nalegao Dindi Nimblak | नगर : दर्शक ।
निंबळक येथील कोटी लिंग तीर्थावरून आषाडी वारीसाठी पंढरपूरला निघालेली संत हरिहर महाराज पायी दिंडीचे आज नालेगाव येथे सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक अजय चितळे यांच्या वतीने स्वागत करून दिंडीचे पूजन करण्यात आले.यावेळी जालिंदर महाराज निकम यांचा सन्मान करण्यात आला.
स्व.चंद्रकला चितळे व स्व.भीमराज चितळे यांच्या स्मरणार्थ संत हरिहर महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या अन्नदान पंगतीसाठी अजय चितळे यांच्या वतीने देणगी देण्यात आली.
यावेळी सचिन चितळे, विनायक वाघ, देवेंद्र बेरड, स्वप्निल राक्षे, संदीप दहिवाले, शंभू बनकर, शुभम घोडे, सुनील चितळे, गजेंद्र कवडे,अरुण लांडे, गणेश लांडे, राजूभाऊ कदम, रामभाऊ कवडे, भैय्या चौधरी, श्रीकांत लांडे, नितीन रोहकले, विशाल बेरड उपस्थित होते.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com