Crime News | पिस्टलने 'या' दोघांवर तीनदा गोळीबार ; न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
जामखेड : दर्शक
जामखेड – जामखेड येथील विंचरणा नदीच्या पुलावर लघवी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून गोळीबार झाला होता. या सर्व सहा आरोपींना अहिल्यानगर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने २४ तासात अटक केली होती. या सर्व आरोपींना जामखेड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
पोलीसात अदित्य बबन पोकळे (वय 20 वर्षे धंदा वॉशिंग सेंटर रा पोकळेवस्ती, जामखेड) याने फिर्याद दिली की, रवीवार दि. १ रोजी रात्री दहा वाजता विंचरणा नदीजवळ घरा जवळ बसलो असताना एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम उतरले व ते तेथे लघवी करू लागले त्यांना येथे लघवी करू नका महीला बसल्या आहेत. असे म्हणल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादी आदीत्य पोकळे यास शिवीगाळ करून मारहाण केली.
यावेळी तेथे कुणाल बंडु पवार (वय २० रा. जामखेड) आला तीन अज्ञातांनी त्यांच्याजवळील पिस्टलने या दोघांवर तीनदा गोळीबार केला. दोन गोळ्या हुकवल्या मात्र एक गोळु कुणाल पवार याच्या पिंढरीतून आरपार गेली. त्यामुळे त्याला जामखेड येथील खाजगी दवाखान्यात उपचार करून नगर येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल केले.
पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ गुन्हयाचा तपास करणेबाबत आदेश दिले. त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे,
पोलीस अंमलदार अतुल लोटके, शाहीद शेख, संदीप दरंदले, रोहित येमुल, किशोर शिरसाठ, गणेश धोत्रे, संतोष लोढे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सागर ससाणे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड, भगवान धुळे अशांचे दोन पथक तयार करून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले.
या पथकाने २४ तासात प्रभरायभान भालेकर, नकुल विष्णु मुळे, शरद अंकुशराव शिंदे, गणेश गोविंद आरगडे, रावबहादुर श्रीधर हारकळ, सुशील ताराचंद गांगवे यांना अटक करून जामखेड पोलीसांच्या ताब्यात दिले.
जामखेड पोलीसांनी वरील सर्व सहा आरोपींना मंगळवारी दुपारी जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com