केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय व हार्टफुलनेस च्या माध्यमातून 23 हजार बांधवांना ध्यानाचा अनुभव

Heartfulness | ध्यानाच्या माध्यमातून जोडलेली हृदय आदर्श समाज निर्मितीस पोषक -  अंजली बापट



नगर : दर्शक ।

 मानवाच्या कल्याणासाठी आंतरिक शांतता, प्रेम, समर्पण याची नितांत आवश्यकता आहे. ध्यानाच्या माध्यमातून देशातील समाजातील गावागावातील माणसांची हृदय ध्यानाच्या माध्यमातून जोडण्याचा सांस्कृतिक मंत्रालय व हार्टफुलनेस संस्थेचा प्रयत्न आदर्श व प्रेमाने भरलेल्या समाज निर्मितीस पोषक असल्याचे प्रतिपादन हार्ट फुलनेस च्या महाराष्ट्र गोवा राज्याच्या प्रमुख समन्वयक सौ अंजलीताई बापट यांनी व्यक्त केले. 



     केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय व हार्टफुलनेस या ध्यान प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्र गोव्यासाठी आयोजित "एकात्म अभियान सोहळ्याच्या यशस्वीते निमित्त आयुर्वेद परिचय केंद्र, धर्माधिकारी मळा, अहिल्यानगर येथे आयोजित  कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी सौ बापट बोलत होत्या. याप्रसंगी एम एच 16 या अहिल्यानगर व बीडचे विभागीय समन्वयक प्रमुख शशिकांत घेर


हार्टफुलनेस शैक्षणिक विभागाचे महाराष्ट्र प्रमुख समन्वयक शुभम बाहेकर, अहिल्यानगर हार्टफुलनेस केंद्राचे प्रमुख समन्वयक डॉ. ऋषिकेश उदमले , श्री महेश लेले अभियानाचे समन्वय श्री. संजय वल्लाळ, डॉ.दत्ता गिरगे , वैद्य मंदार भणगे ,डॉ. अर्चना गिरगे ,श्री  अमोल आंदे,श्री. विष्णू पालीवाल ,श्री. भरत आठरे , सौ.शुभांगी केंगे, सौ. रीना खरमाळे आदि प्रशिक्षकासह असंख्य अभ्यासी , स्वयंसेवक व नागरिक उपस्थित होते. 

          सौ. अंजलीताई बापट यांनी पुढे बोलताना धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच आत्मिक शांततेची आवश्यकता आहे. हार्टफुलनेस आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून राबवलेल्या अभियानातून महाराष्ट्र आणि गोव्याच्या विभागात 16,251 गावात सुमारे तीन लाख 12 हजार लोकांपर्यंत ध्यान अनुभव देण्यात आला आहे. 


या एकात्म अभियानाच्या यशस्वीते नंतर दुसऱ्या टप्प्यात सर्व स्तरात ध्यानाचा सखोल अनुभव देऊन त्यामध्ये सातत्य आणण्याचा प्रयत्न आहे. हॉटफुलनेस चे प्रमुख पद्मभूषण सन्मानित श्री कमलेश जी पटेल (दाजी) , यांच्या मार्गदर्शनातून भारतभर हे अभियान सुरू असून चैतन्यमय ,शांतताप्रिय आणि आत्मिक उन्नती साधणारा देश घडवण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या .


         एम एच 16चे प्रमुख समन्वयक श्री शशिकांत घेर यांनी यावेळी बोलताना " अहिल्यानगर व बीड जिल्ह्यात "एकात्म अभियान "यशस्वीरित्या राबवून सुमारे यांचे 585 गावातून 23 हजार 166 समाज बांधव भगिनींच्या हृदयाला ध्यानाचा स्पर्श झाला आहे. प्रशिक्षक व हार्टफुलनेस चे सक्रिय स्वयंसेवक यांचे नियोजन व उत्साह आणि त्याला प्रशासनाची मिळालेली साथ यामुळे हे अभियान अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाले आहे. पुढच्या टप्प्यात समाजाच्या तळागाळात जाऊन व इच्छुक अभ्यासींचे संघटन करून गावागावात ध्यान केंद्र सुरू करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. 


        यावेळी केंद्रप्रमुख डॉ. ऋषिकेश उदमले यांनी या अभियानासाठी सहकार्य करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषद आरोग्य विभाग,  हार्टफुळलणेस राज्याचे एम एस 16 विभागाचे तसेच अहिल्यानगर केंद्राचे सर्व प्रशिक्षक व स्वयंसेवक यांचे यांचे आभार मानले.

       याप्रसंगी श्री. शुभम बाहेकर, प्रशिक्षक श्री. दत्ता गिरगे,श्री.संजय बल्लाळ, डॉक्टर श्री. सुजित ठाकूर यांनी मनोगते व्यक्त केली. 

       या एकात्म अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणारे प्रशिक्षक सहकारी स्वयंसेवक यांचा यावेळी सौ अंजलीताई बापट व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर ऋषिकेश उदमले तर आभार डॉक्टर दत्ता गिरगे यांनी मानले.

      यावेळी मोठ्या संख्येने   हार्टफुलेस अहिल्यानगर केंद्राचे अभ्यासी,स्वयंसेवक ,सदस्य , धर्माधिकारी मळा परिसरातील नागरिक उपस्थित होते.