Nagar Dongergan Dindi | डोंगरगणच्या ज्ञानेश योगाश्रमच्या दिंडीचे नगरमध्ये स्वागत
नगर : दर्शक ।
Nagar Dongergan Dindi | जवळच असणाऱ्या डोंगरगण येथील जंगले महाराज शास्त्री यांच्या ज्ञानेश योगाश्रम संस्थेच्या पंढरपूर आषाडी दिंडी सोहळाचे नगरमध्ये बुरूडगाव रोड येथील नक्षत्र लॉन येथे आगमन झाल्यावर भक्त मंडळाकडून स्वागत व सेवा करण्यात आली.
भागवत महाराज जंगले शास्त्री यांचे व वारकर्त्यांचे स्वागत रयत शिक्षण संस्था,सातारा जनरल बॉडी सदस्य आर्किटेक अनिल साळुंके यांनी स्वागत केले व पादुका पूजन, रथाचे पूजन करण्यात आले.
यावेळी माजी महापौर भगवान फुलसौदर, जालिंदर बोरुडे,शहर बँकेचे संचालक अशोक कानडे,विष्णू फुलसौदर , अशोक बाबर,,साळुंके परिवार सह मोठ्या संख्नेने भक्त मंडळाचे सदस्य उपस्तिथ होते.
दुपारी वारकर्यांना भोजन सेवा साळुंके परिवाराच्या वतीने देण्यात आली. तसेच औषधाचे किट देण्यात आले,नगरमधून मोठ्या प्रमाणावर लोक या दिंडी मध्ये सहभागी होतात.यामध्ये सुशिक्षित,सरकारी नोकरदार,अधिकारी, उद्योजक यांचा समावेश असतो,हि स्वावलंबी व कडक शिस्तीची पायी दिंडी म्हणून प्रसिद्ध आहे.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com