RPI Nished on Padalkar |  आ. गोपीचंद पडळकर यांच्या ख्रिश्चन धर्मावरील वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निषेध ; ख्रिश्चन समाजाला जाहीर पाठिंबा

RPI Nished on Padalkar | ख्रिश्चन धर्मावरील वक्तव्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा निषेध






RPI Nished on Padalkar |  नगर : दर्शक  | 

 सांगलीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक कार्यक्रमात ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने शहर जिल्हाध्यक्ष हरीश अल्हाट यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने या प्रकाराचा निषेध व्यक्त केला असून, ख्रिश्चन समाजाला जाहीर पाठिंबा दिला आहे.






 काल निवेदन देताना ख्रिश्चन धर्मगुरू रेवरेंट जे. आर. वाघमारे व रेवरेंट मार्टिन पारदे यांच्याकडे पाठिंबा दर्शवण्यात आला. यावेळी युवक अध्यक्ष संदीप वाघमारे, किरण कांबळे, तरुण शिंदे, राहुल मुक्तीकर, संदीप पोळ, अतुल शिंदे, मनोज साळवे, लुकस क्षेत्रे, जयदेव देवडे, कुंदन भिंगारदिवे, नकुल क्षेत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते.




या प्रसंगी बोलताना हरीश अल्हाट म्हणाले, “ख्रिश्चन समाजावर होणारे आरोप, अपमानास्पद वक्तव्य आणि त्यांच्याविरुद्ध हिंसक भाषा वापरणे हे केवळ धर्माच्या स्वातंत्र्याचा अपमान नाही, तर भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांचाही अवमान आहे. आमदार पदासारख्या जबाबदार स्थानावर बसून असा धार्मिक तेढ पसरवणारा माणूस लोकप्रतिनिधी होण्यास अपात्र आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्यात यावी.”





पुढे बोलताना त्यांनी सांगितले, “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी सामाजिक न्यायासाठी लढणारी चळवळ आहे. आमचा पक्ष कोणत्याही प्रकारच्या धार्मिक द्वेषाला व हिंसक प्रवृत्तींना थारा देत नाही. ख्रिश्चन समाजावर अन्याय झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत उभे राहू आणि शांतता, बंधुभाव, संविधानिक मूल्ये यांचा पुरस्कार करत अशा तत्वांच्या विरोधात रस्त्यावर उतरू.”