Top News

Nagar Fort | नगर भुईकोट किल्ल्याजवळ दिसला 13 फुटी रॉक पायथन अजगर

 गोविंद जोशी यांनी वर्षभरात वाचवले ४ अजगरांचे प्राण




Nagar Fort | नगर : दर्शक । 

            येथील किल्ल्या जवळील आय लव नगर गार्डन जवळ काल रात्री १३ फुटी  रॉक पायथन  अजगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी गोविंद जोशीकौशल जोशी व करण पारखे यांना रात्री घरी जाताना दिसला.त्यांनी त्वरित सर्पमित्र अमित गायकवाड यांना बोलून घेतले व त्याला पकडण्यासाठी त्यांना अर्धा तास लागला.यावेळी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती,सकाळी त्याला दूर जंगलात निसर्ग अधिवासात सोडण्यात आले 


           गोविंद जोशी यांनी आत्तापर्यंत या परिसरात वर्षभरात ४ अजगराचे प्राण वाचवले आहेत तसेच अनेक सरपटण्याऱ्या प्राण्याचे त्यांनी अनेक वर्षापासून  प्राण वाचवत  आहेत्यांना रेसिक्यू करून त्याच्या अधिवासात सोडत आहेतयामध्ये ३ किल्ल्याजवळ व १ बेलेश्वर मंदिर जवळ त्यांनी पाहिल्यावर सर्पमित्रांना बोलावून त्यांना पकडले.



नाहीतर रात्रीच्या वेळेस हे गाडीखाली येऊन मृत्युमुखी पडतात,रात्रीच्या वेळेस हे अजगर पावसाळ्यात,उन्हाळ्यात बाहेर पडतात.त्यामुळे या परिसरात रात्री पायी  फिरताना व गाडी चालवणाऱ्यांनी काळजी घ्यावी असे सरपटणारे प्राणी दिसल्यास त्यांना वाचवावे व त्वरित सर्पमित्रांना कळवावे असे ते म्हणाले 


           हा भाग निसर्ग संपन्न आहे तसेच नगरजवळ सर्वच ठिकाणी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत,यामध्ये भारतात  रॉक पायथन   हा दुर्मिळ होत चाललेला आहे आणि त्याला वाचवण्याची गरज आहे,किल्ला परिसरात  परिसरात मोर,विषारी बिनविषारी सर्प,विविध पक्षी यांचा मोठ्या प्रमाणावर ती अधिवास आहे. येथे जंगल पण आहे व खंदक पण आहे,त्यामुळे त्यांना सुरक्षित जागा आहे,जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी त्यांचे संवर्धन करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी ही गोविंद जोशी यांनी केली आहे.


        अजगर (Rock Python) हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे.सरीसृप वर्गातील बोइडी कुलातील पायथॉनिनी उपकुलात त्याचा समावेश होतो.


जगाच्या विविध भागांत अजगराच्या अनेक जाती आढळतात.पायथॉन मोलुरस या जातीचे अजगर संपूर्ण भारतात आढळतात.याला रॉक पायथॉन असेही म्हणतात.घनदाट वनात,झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. 

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने