Nagar Music | आंतरराष्ट्रीय "थेअरी ऑफ म्युझिक" संगीत परिक्षेत ग्रेस म्युझिक अॅकॅडमीचे घवघवीत यश
Nagar Music | नगर : दर्शक ।
लंडन येथील ट्रीनिटी कॉलेजच्या वतीने घेण्यात आलेल्या थेअरी ऑफ म्युझिक ग्रेड 1 संगीत प्ररिक्षेत नगरमधील ग्रेस म्युझिक अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
या परिक्षेत अभिषेक पोळ (98/100), ईशा बड्वे (97/100), अँरन पंडीत (96/100) अँजेलो थोरात (96/100), ओंकार राऊत (96/100),ओजस राऊत (94/100), शलमोन पहिलवान (87/100) आशिता लोखंडे (84/100) यांनी या परिक्षेत गुणवत्तापूर्वक यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
याप्रसंगी पिटर पंडीत सर म्हणाले, संगीताला भाषा, देश,प्रांत नसतो.एक अविट आनंद देणारे संगीत सर्वांनाच भावत असते. संगीत साधनेतून निर्माण होणाऱ्या या कलेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद असेच आहे.
परिक्षेतील सहभागामुळे देश-विदेशातील संगीताचे ज्ञान वाढण्यास मदत झाली. त्यात मिळविलेल्या यशामुळे विद्यार्थ्यां मधील आत्मविश्वास वाढला असल्याचे सांगितले.
या परिक्षेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहीतीसाठी ग्रेस म्युझिक ॲकॅडमी डॉन बॉस्को कॉलनी, काॅटेज कॉर्नर जवळ, सावेडी, अहिल्या नगर येथे किंवा 9511224794/ 9890978997 या क्रमांकावर संपर्क करावे. असे आवाहन पिटर सर व सोनाली मॅडम यांनी केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com