Nagar School | रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूलचा 65 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल, नगर या विद्यालयाचा 65 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक थाटात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या संस्थापक दिवंगत मोतीलालजी आणि रूपीबाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी स्मारकाजवळ श्रीमती मुळे मॅडम आणि विद्यार्थिनींच्या हस्ते सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली. तसेच श्री काळे सर यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा फलक साकारला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री अजयकुमार बारगळ यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नितीन कमलकर यांनी केले. प्राचार्य श्री अजयकुमार बारगळ यांनी आपल्या भाषणात 1960 मध्ये स्थापन झालेल्या न्यू इंग्लिश स्कूलचा समृद्ध इतिहास, संस्थेची वाटचाल आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे ऋणनिर्देश श्री कराळे सर यांनी केले. संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी विद्यालयास वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सेवक श्री पांढरे आणि श्री अमोल बांगर यांनी केले. यावेळी विद्यालयाचे उपप्राचार्य श्री भांड सर, पर्यवेक्षक श्री गिरी सर, सर्व अध्यापक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, सेवक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा सोहळा विद्यालयाच्या गौरवशाली वाटचालीचा साक्षीदार ठरला असून, विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.

0 تعليقات
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com