Nagar Swimming | नगरच्या कराळे क्लब हाऊसच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी नगर येथील स्विमिंग स्पर्धेत मारली बाजी
Nagar Swimming | नगर : दर्शक ।
येथे नुकत्याच झालेल्या वर्षा मंगल ओपन स्विमिंग स्पर्धेत नगर येथील कराळे क्लब हाऊसच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत विजयी घोडदौड केली. एमजीएम स्पोर्ट्स क्लब अॅन्ड स्टेडियम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत विविध वयोगटातील स्पर्धकांनी पदकांची लयलूट केली.
14 वर्षेवयोगटात तन्वी आवटे हिने 50 मि. ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये रौप्य पदक, 50 मि. बॅक स्ट्रोकमध्ये रौप्य पदक तर 50 मि. फ्रीस्टाइलमध्ये कांस्य पदक पटकावले.
10 वर्षांखालील गटात काव्या मराठे हिने 50 मि. फ्रीस्टाइलमध्ये कांस्य पदक, 50 मि. बॅक स्ट्रोकमध्ये रौप्य पदक आणि 50 मि. फिन्स प्रकारात रौप्य पदक मिळवले.
12 वर्षांखालील गटात स्वराली तांदळे हिने 50 मि. फिन्स प्रकारात कांस्य पदक पटकावले.
तर 17 वर्षेवयोगटात अम्रीतसिंग रजपूत याने जबरदस्त प्रदर्शन करत एकाच स्पर्धेत पाच सुवर्णपदके मिळवत चॅम्पियनशिपचा मान पटकावला. त्याने 50 मि. फ्रीस्टाइल, 50 मि. ब्रेस्ट स्ट्रोक, 50 मि. बॅक स्ट्रोक, 50 मि. बटरफ्लाय आणि 50 मि. फिन्स या पाचही प्रकारांत सुवर्णपदके मिळवली.
या यशामध्ये कराळे हेल्थ क्लबचे संचालक करण कराळे आणि जलतरण विभागाचे प्रशिक्षक सर्वेश देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे विद्यार्थ्यांचे शहरात कौतुक होत असून पालक आणि क्रीडाप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com