डिस्ट्रिक्ट् प्रोबेशन अॅन्ड ऑफटर केअर असोसिएशन संचालित शिशुगृह, या संस्थेत दत्तक विधान सोहळा पार पडला
Adoption Ceremony Nagar | नगर : दर्शक । डिस्ट्रिक्ट् प्रोबेशन अॅन्ड ऑफटर केअर असोसिएशन संचालित शिशुगृह, या संस्थेत दत्तक विधान कार्यक्रम पार पडला. इटली या देशातील 2 पालकांनी संस्थेतील अनाथ 1 मुलगा व 1 मुलगी दत्तक घेतली असून राजस्थान येथील पालकांनी संस्थेतील 1 अनाथ मुलगा दत्तक घेतला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिशुगृह विभागाचे व्यवस्थापक श्री. रविंद्र कानडे यांनी केले व संस्थेविषयी सविस्तर माहिती दिली. तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत संस्थेच्या पदाधिकारी सौ. विनिता आशुतोष गुणे यांनी केले व दत्तक पालकांना शुभेच्छा देऊन बालकांचा कायदेशीररित्या ताबा पालकांना दिला.
तर कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या मानद सचिवा डॉ. शकील फातिमा बशीर अहमद शेख यांनी मानले व त्यांचे मनोगत व्यक्त केले. ऋसंस्थेच्या प्रतिनिधी सौ. सिमरन बत्रा व इटली देशामधील पालक यांनी आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले.
सदर कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्याचे बाल संरक्षण अधिकारी श्री. वैभव देशमुख, संस्थेच्या सदस्या श्रीमती स्वाती कुलकर्णी, ऋऋच्या सौ. सिमरन बत्रा, शिशुगृह सोशल वर्कर प्रतिक्षा आव्हाड, बालरोग तज्ञ डॉ. सुरेंद्र रच्चा व संस्थेचे शिशुगृह व बालगृह विभागाचे कर्मचारी व बालके उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com