Snehalay | शमी गणपती ट्रस्टचा पूरबाधित स्नेहांकुरला सहयोग
नगर : दर्शक ।
येथील प्रख्यात शमी गणपती ट्रस्टने पूराचा फटका बसून वाताहत झालेल्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राला 25 हजार रुपयांचा तातडीचा सहयोग दिला आहे. 27 मे रोजी आलेल्या पुरामुळे केडगाव येथील स्नेहांकुर प्रकल्पात तळमजल्यावर पाच फुटांपर्यंत पाणी पसरले. प्रकल्पाची कुंपणाची भिंत वाहून गेल्यावर तळमजल्यावरील अंदाजे 7 लक्ष रुपयांचे सर्व सामान वाहून गेले.
या दुर्घटनेबद्दल समजल्यानंतर शमी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देशमुख, सचिव शरद देशमुख ,विश्वस्त प्रा. डॉ. उदय नगरकर, राजेश देशमुख, दिलीप श्रीकृष्ण निसळ यांनी तातडीची बैठक घेऊन ट्रस्टतर्फे मदत स्नेहांकुर प्रकल्पाचे संचालन करणाऱ्या स्नेहालय संस्थेला मदत दिली.
शमीच्या झाडांच्या मुळ्या श्री गणेशाच्या आकाराच्या विकसित झाल्या. त्यातून येते शमी गणपती स्थापित झाला.
आपली शताब्दी पूर्ण केलेल्या शमी गणपती मंदिराच्या ट्रस्टची स्थापना मामा शुक्रे यांनी 1942 साली केली.
मंदिरात जमा झालेले नारळ आणि खाद्यपदार्थ येथे दररोज गरीब गरजूंना वितरित केले जातात.
स्नेहालय संस्थेतर्फे अध्यक्ष जया जोगदंड, सचिव डॉ. प्रीती भोंम्बे, खजिनदार गीता कौर, विश्वस्त सपना असावा, अनघा बंदिस्टी , रूपाली मुनोत, मुग्धा राजेंद्र शुक्रे , यांनी शमी गणपती ट्रस्टची कृतज्ञता व्यक्त केली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com