Varkari Nagar | वारकऱ्यांची चरणसेवा साक्षात पांडुरंगाची सेवा 

Varkari Nagar | वारकऱ्यांची चरणसेवा साक्षात पांडुरंगाची सेवा




        


 नगर । दर्शक  : 


पायी चालणाऱ्या वारकऱ्यांची पायाला मॉलिश करणे त्याचे पाय चेपून देणे म्हणजे ती प्रत्यक्ष पांडुरंगाची सेवा आहे, त्यांना दिली जाणारी वैद्यकीय सेवा हि कौतूकास्पद आहे असे प्रतिपादन मार्केटयार्ड व्यापारी मित्र  मंडळाचे अध्यक्ष अमोल पोखरणा यांनी केले 



             विश्व हिंदू परिषदेतर्फे नाशिक ते पंढरपूर वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी सेवा दिली जाते.मोफत औषध उपचार देण्यात येतो.


गेल्या 14 वर्षापासून विश्व हिंदू परिषदेचा हा उपक्रम सुरू आहे.त्याला आज पोखरणा परिवाराच्या वतीने औषधें भेट देण्यात आली 



त्यावेळी ते बोलत होते.यावेळी भाऊराव कुदळे , सुनील खिस्ती, अनिल जोशी, शरदराव नगरकर,डॉक्टर ज्ञानेश्वर कमोद,मुकुल गंधे,राजेंद्र चुंबळकर आदींसह काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आरोग्य सेवा देण्यासाठी उपस्थित होते.


निवृत्तीनाथ दिंडी मध्ये जखमी रुग्णांना उपचार केले जात आहेत. तसेच गरजू रुग्णांना सलाईन लावण्यात आले आहे.तसेच वृद्ध नागरिकांचे पायाची तेल लावून मालिश देखील करण्यात आली आहे.