Nagar Urban Bank | नगर अर्बन बँके ठेवीदारांसाठी दिलासा ; रक्कम परत मिळणार 

Nagar Urban Bank | नगर अर्बन बँके ठेवीदारांसाठी दिलासा ; रक्कम परत मिळणार




नगर । दर्शक  : 



 नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांसाठी दिलासा पाच लाखांपेक्षा जास्त रकमेची ठेव पावती असलेल्या ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50 टक्के इतकी रक्कम जुलै महिन्यात मिळणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली.


याबाबत डीआयसीजीसी यांच्याकडे ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार डीआयसीजीसी कार्यालयाकडून संबंधित ‘ना हरकत’ प्रमाणपत्र नुकतेच बँक प्रशासनास प्राप्त झाले आहे. 


त्यामुळे पाच लाखांपेक्षा जास्त ठेव रक्कम असलेल्या व विहित नमुन्यातील क्लेम फॉर्म व केवायसी अपडेट केलेल्या 1926 ठेवीदारांना ठेव पावतीच्या 50 टक्के इतकी रक्कम जुलै महिन्यात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.



संबंधित ठेवी परत करण्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याचे आरबीआयशी निगडित कामकाज जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्यानंतर या रकमा ठेवीदारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत अशी माहिती बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी दिली