Yoga Nagpure | आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप 


Yoga Nagapur  | आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप


            

 Yoga Nagapur  |  नगर : दर्शक । 

येथील नवनागापूर येथे जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य व श्री साई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी आरोग्यपूर्ण जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. 



         नगर जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत योगासने आणि प्राणायाम करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून साई मंदिराच्या परिसरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संगोपणाच्या समर्थनार्थ वृक्ष दिंडी काढून श्री साई मंदिरात योगासने आणि प्राणायाम केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. 




           यावेळी  ग्रामपंचायत सदस्य बंडूनाना सप्रे,सागर सप्रे,राहुल सप्रे, सुभाष दांगट, गोरख गव्हाणे,वडगाव गुप्ताचे सरपंच विजयराव शेवाळे,उद्योगपती बाळासाहेब बडे,पार्थ शेवाळे,ज्ञानेश्वर आजबे,विपुल डोंगरे,सुयोग घोलप,बाळासाहेब चाबुकस्वार,ग्राम अधिकारी ज्ञानदेव आडसुरे,अनिल सत्रे,सोन्याबापु शिंदे,



नंदकुमार घुगे,लहू सुलाखे, नामदेव शिंदे,नितीन(दाजी) खंडारे,महेश कदम,हरिभाऊ मोरे,प्रवीण तुराणकर,चंद्रकांत मावळकर,राजेंद्र आटपाळे,आकाश कोल्हाळ,आकाश पवार,गणेश झीने,सोमनाथ आढाव,शरद आढाव,विशाल बरे, शुभम हजारे,जयेश शास्त्री बिडकर यांसह गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




         आयुष मंत्रालयाच्या आदेशाने प्रत्येक मूल सुदृढ आणि निरोगी व्हावे या उद्देशाने जगभरात योग दिन उत्साहात साजरा केला जात आहे. तसेच वातावरणातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये पर्यावरणाची संकल्पना रुजवण्यासाठी योगासनाचे धडे देऊन वृक्षारोपण केले गेले,जयहिंदचे संस्थापक अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.तसेच योग प्रशिक्षक संजय सुरसे व महिला सहकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.