विद्यार्थ्यांनी घेतला योग, प्राणायाम व ध्यानाचा अनुभव

Yoga Nagar | जागतिक योग दिन हार्टफुलनेसतर्फे नगर जिल्ह्यात उत्साहात साजरा




Yoga Nagar | नगर : दर्शक । 
 21 जून, जागतिक योग दिनानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यात हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने विविध ठिकाणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हैदराबाद येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या ध्यान केंद्र कान्हा शांतीवनम येथे हार्टफुलनेसचे मुख्यालय असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही संस्थेच्या वतीने जगभरात योग दिन साजरा करण्यात आला.




नगर जिल्ह्यातील मेहेकरी येथील श्री सद्गुरु माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच टाकळी काझी येथील श्री बन्सीभाऊ म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथेही हार्टफुलनेसच्या वतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आले.



श्री सद्गुरु विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात हार्टफुलनेसचे प्रशिक्षक श्री. भरत आठरे यांनी विद्यार्थ्यांना योगासने, प्राणायाम, शिथिलीकरण व ध्यानाचा अनुभव दिला. या वेळी प्राचार्य टेकाळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.



टाकळी काझी येथील कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे संयोजन करताना प्राचार्य श्री. म्हस्के सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. यावेळी श्री. मच्छिंद्रनाथ ढवळे, कु. आदिती आठरे व सौ. उज्वला म्हस्के यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले.


या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी हार्टफुलनेस संस्थेचे अ.नगर व बीड झोन समन्वयक श्री. शशिकांत घेर तसेच अहिल्यानगर केंद्राचे प्रशिक्षक श्री. सुनील वल्लाळ यांचे मोलाचे योगदान लाभले.