Blood Camp |  १०५ युनिट रक्तदान – नेशनल रेल्वे मजदूर यूनियनचा विक्रमात्मक उपक्रम 


Blood Camp | अहमदनगर रेल्वे स्थानकावर नेशनल रेल्वे मजदूर यूनियनच्यावतीने रक्तदान शिबिर






नगर : दर्शक । 

       नेशनल रेल्वे मजदूर यूनियन (NRMU) अहमदनगर शाखेच्या वतीने अहमदनगर रेल्वे स्थानक परिसरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन अहमदनगर NRMU अध्यक्ष विजय सालुंखे व RPF इन्स्पेक्टर बेणी प्रसाद मीणा, सचिव राहुल पंडित आणि अहमदनगर इंजिनिअरिंग ब्रँचचे सहाय्यक सचिव ऋषिकेश मीणा तसेच अजयकुमार चौबे (SSE/Works/Incharge/ANG) यांच्या सहकार्याने करण्यात आले.



        या शिबिराचे आयोजन कॉम्रेड संदीप सेळार (विभागीय अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली व NRMU चे लढवय्ये जनरल सेक्रेटरी वेंणू पी. नायर यांच्या प्रेरणेतून करण्यात आले. शिबिरात तब्बल १०५ युनिट रक्तदान झाले.



         यावेळी विविध विभागांचे इंचार्ज उपस्थित होते आणि त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हे रक्तदान शिबिर यशस्वी झाले. या उपक्रमामुळे समाजात मानवतेचा संदेश पोहोचविण्यासोबतच गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या शिबिरात तरुणांबरोबर महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.




         सचिव ऋषिकेश मीणा  म्हणाले, रक्तदान ही खरी सेवा असून, आपल्या एका थेंब रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. NRMU ही केवळ कामगार संघटना नसून समाजासाठीही कर्तव्य बजावणारी संघटना आहे, हे या रक्तदान शिबिरातून सिद्ध झाले आहे. अशा उपक्रमांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकतेची भावना वाढीस लागते आणि समाजाशी आपली नाळ आणखी घट्ट होते.



       ते पुढे म्हणाले, आज आपण १०५ युनिट रक्तदान करून एक नवा विक्रम घडवला आहे. या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून गरजू रुग्णांना नवी आशा मिळणार आहे. पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने घेऊन समाजसेवेचा ध्यास कायम ठेवू. NRMU च्या प्रत्येक सदस्याने ही जबाबदारी जाणून अशा कार्यात सहभागी व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.



यावेळी विजय सालुखे. ऋषिकेश मिना.श्रवण कुमार. राहुल पंडित. संजय झा. रोहित कसबे. तनीश तलोले. अमजद पठाण दिनेश चावडे. अंकित कुमार. देवीप्रसाद यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर पार पडले