डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील 12 विद्यार्थ्यांची सरकारी क्षेत्रात निवड - महाविद्यालयाचा गौरव    


Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीचे १२ विद्यार्थी शासकीय नोकरीत 

Dr Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीचे १२ विद्यार्थी शासकीय नोकरीत





नगर : दर्शक ।                 

 विळद घाट येथील डॉ.विठ्ठल राव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या 12 विद्यार्थ्यांची विविध शासकीय विभागांत अधिकारीपदी निवड झाल्याची गौरवास्पद कामगिरी नुकतीच पार पडली आहे. या यशामुळे महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधोरेखित झाला असून महाविद्यालयाच्या परिसरात आनंदाचे वातावरण आहे.       






महाविद्यालयास नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रिडिटेशन कौन्सिल (छउ) चे ’ए प्लस’ मानांकन प्राप्त असून स्थापत्य अभियांत्रिकी विभागास ’एनबीए’ नवी दिल्ली मान्यता प्राप्त आहे. या गुणवत्तेचा उत्तम प्रत्यय यंदाच्या शासकीय निवडीतून उमटला आहे.







अलिकडेच जाहीर झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, भूसंपदा विभाग व महानगरपालिका यासारख्या विविध शासकीय परीक्षांमधून या यशस्वी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये बहाड मयूरी (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक - जलसंपदा विभाग), फकीर साहिल (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक - सार्वजनिक बांधकाम विभाग), तसेच सहायक कार्यकारी अभियंता पदासाठी कासार राहूल, वाडेकर सागर, भालेराव रुपाली, मयूरी रासकर व बारगळ मोहित यांचा समावेश आहे.




महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून थोरात समृद्धी, जाधव मयूरी व बोरुडे सौरभ यांची निवड झाली असून जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून पाटील प्रियांका यांची निवड झाली आहे.




         या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल स्थापत्य विभागप्रमुख डॉ. उर्मिला कवडे व विभागातील सर्व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.या घवघवीत यशाबद्दल महाविद्यालयासह संपूर्ण संस्थेमध्ये कौतुकाची लाट उसळली आहे.



        या यशाबद्दल विखे पाटील फाउंडेशनचे डायरेक्टर टेक्निकल प्रा. सुनील कल्हापुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र नवथर, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट अधिकारी प्रा. सुदर्शन दिवटे, विभागीय समन्वयक प्रा. आयन सेनगुप्ता व प्रा. अनिरुद्ध शिर्के यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



संस्थेचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, डायरेक्टर जनरल (प्रशासन) डॉ. पी.एम.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.



या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे प्रतिक असून, या यशामुळे पुढील विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे.