जिल्हाधिकार्यामार्फत शासनाला निवेदन सादर
नगर : दर्शक ।
राज्य शासनाच्या शिक्षणविषयक निर्णयांमुळे मराठीसह सर्व माध्यमांच्या अनुदानित शाळा अडचणीत सापडल्या आहेत. काही शाळा बंद झाल्या असून अनेक शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर नगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे सकाळी 10 वाजता निदर्शने करण्यात आली. यावेळी शासनाकडे मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गांधी मैदान, नवीपेठ, अहिल्यानगर यांच्या पुढाकाराने मा. मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे हे निवेदन देण्यात आले. शासनाच्या विविध धोरणांमुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापक यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या निवेदनाद्वारे काही महत्त्वाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे -
1. दिनांक 15 मार्च 2024 चा संचमान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करून 28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करावी.
2. शिक्षक भरती प्रक्रिया वर्षातून दोन वेळा पोर्टलद्वारे राबवावी.
3. 01 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
4. 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अघोषित शाळांना मान्यता द्यावी व अनुदान टप्पा त्वरीत मंजूर करावा.
5. शिक्षकेतर कर्मचार्यांचा आकृतीबंध रद्द करून चतुर्थ श्रेणी व इतर कर्मचार्यांची नियुक्ती पूर्वीप्रमाणे करावी.
या आंदोलना बाबत बोलताना मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य सुनिल पंडित यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिक्षक फक्त शिकवत नाही, तर व्यवस्थेतील त्रास सहन करत शाळा उभ्या ठेवतो आहे. शासनाचे निर्णय शाळा बंद होण्याकडे नेत आहेत. शिक्षक भरती बंद, अनुदान अडकले, जुनी पेन्शन नाही - यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मानसिक व आर्थिक अडचणीत आहेत. शासनाने हे गंभीरपणे घ्यावे, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल.
या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक शिक्षक, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी शासनाच्या निर्णयांविरोधात शिस्तबद्ध व शांततेने निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला.
शिक्षण क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी या मागण्या लवकरात लवकर मान्य करण्याची मागणी समितीने शासनाकडे केली आहे. या आंदोलनामध्ये माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन व माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य सचिव विठ्ठल उरमुडे सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे ज्ञानदेव बेरड वैभव सांगळे सोपानराव कदम श्रीकृष्ण पवार प्रसाद सामलेटी सचिन गुंजाळ आर वी शिदोरे बोडके जी बाबासाहेब शिंदे दीपक आरडे नितीन केणे राजेंद्र जगड उद्धवराव गुंड घनश्याम सानप ग .अ . गाडगीळ नितीन शेखर मुंडे म्हस्के शंकर आढाव अशोक सोनवणे संदीप राहणे नाकाडे अण्णासाहेब श्रीकांत शेलार आधी उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com