Ward No 4 | कर्मचाऱ्यांचे सहकार्य नसते तर नागरिकांचे हाल अधिक वाढले असते - सौ. संगीता खरमाळे

Ward No 4 | गुलमोहर पार्कमध्ये जलप्रश्न सोडवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार



     नगर, प्रभाग क्र. ४ – गुलमोहर पार्क येथे गेले दोन महिने कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. या समस्येची दखल घेऊन पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्नांती समस्या सोडवली. त्यांच्या या कार्याची दखल घेत गुलमोहर पार्कमधील रहिवाशांच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.



       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेविका सौ. संगीता ताई खरमाळे होत्या. त्या म्हणाल्या, “पारिजात चौकात रस्त्याचे काम सुरु झाल्यानंतर ठेकेदाराकडून वारंवार पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे गुलमोहर पार्कमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. नागरिकांनी पाण्यासाठी प्रचंड हाल सोसले. मात्र पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर प्रतिसाद देत सहकार्य केले. त्यांच्या सत्काराने त्यांच्या सेवेला सन्मान मिळतो आहे.”



      या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करताना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. गुलमोहर पार्क येथील रहिवासी संतोष बडवे यांनी म्हटले की, "गेल्या दोन महिन्यांपासून पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत होते. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी प्रयत्न करत अखेर ही समस्या सोडवली. त्यामुळे त्यांचा सन्मान होणे गरजेचे होते."



कुंडलिक मचे , राख साहेब, सोनवणे आजी, उत्तम भोसले आदींनीही आपले विचार मांडून कर्मचार्‍यांच्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.



     कार्यक्रमात पाणीपुरवठा विभागातील श्री. प्रदीप ढगे, आपाकभाई, भरत पवार, खाडे मामा आदी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.



      यावेळी सौ. स्वाती जाधव, प्रज्ञा शिरसागर, कमल दाणे, सौ. देशमुख, सुमेधा बडवे, श्रीमती माने, सौ. भोसले, सौ. रामदासी, सौ. शिर्के, सौ. मचे , सौ. त्रिवेणी घुले, श्रीमती घोलप, जाधव आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



     कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक रहिवासी व समितीचे विशेष योगदान लाभले.