सावेडीत जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळचा जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात संपन्न 


सावेडीत जिव्हेश्वर भक्त सेवा मंडळचा जिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात संपन्न


        

नगर : दर्शक । 

गावडे मळा, सावेडी येथील शिवालय आणि भगवान जिव्हेश्वर मंदिरामध्ये  स्वकुळसाळी बांधवांच्या उपस्थितीत वेदमूर्ती व शिवपुत्र स्वकुळसाळी समाजाचे आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर यांचा जन्मोत्सव पार पडला.जिव्हेश्वर महिला मंडळ तर्फे पहाटे जन्मोत्सव आणि पाळणा गीत सादर करण्यात आले.श्री व सौ ओंकार जाळींद्रे कुटुंबीय यांचे हस्ते सकाळी अभिषेक, पादुका पूजन करण्यात आले आणि श्री व सौ आशुतोष शेळके पाटील यांचे हस्ते पालखी पूजन करण्यात आले.             




     दुपारी दोनशे समाजबांधवांच्या उपस्थितीत पायी पालखी शोभायात्रा काढण्यात आली.त्यामध्ये शाळकरी मुलांनी भाग घेऊन जयघोष केले.नंतर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कृतिशील संघटनेचे  मनोहर पोकळे होते तर प्रमुख पाहुणे  किसनराव शेळके होते.यावेळी  व्यासपीठावर नगरसेविका दीपाली बारस्कर आणि मीनाताई चव्हाण, पांडुरंग डफळ,विठ्ठलराव पाठक उपस्थित होते


         


      याप्रसंगी मा महापौर श्री बाबासाहेब वाकळे,नगरसेवक  अनिल बोरुडे यांनी भगवान श्री जिव्हेश्वर मूर्तीचे दर्शन घेऊन साळी बांधवांना शुभेच्छा दिल्या.मंडळाचे पदाधिकारी  नंदकुमार सुपेकर यांनी ३५ गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आयोजित केले.यावेळी भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष अविनाश झिकरे, उपाध्यक्ष मृणाल कनोरे, सचिव संजय मते,खजिनदार नंदकुमार सुपेकर तसेच स्नेहल कौसल्ये,सुनील पावले,सुभाष पाठक,आकाश आतकरे,प्रमोद पाटेकर उपस्थित होते.कार्यक्रमात महिला भजन मंडळाच्या सीमा पाठक,विद्या कांबळे,अमिता भागवत,छाया दिवाणे-राजपूत तसेच सुभाष पाठक यांनी सुश्राव्य भजन सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली. 




         पदाधिकारी नलिनी कनोरे, सुषमा साळी आणि विमल पाठक यांनी भक्त सेवा मंडळाच्या वतीने होणाऱ्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.प्रमोद पाटेकर यांनी मंदिरासाठी येणाऱ्या वार्षिक खर्चाचे अंदाज पत्रक सादर केले.या कार्यक्रमाला महाप्रसाद उद्योजक ओमप्रकाश झिकरे यांनी आयोजित केला होता.