६३ के व्ही डीपी,स्ट्रीट लाईटचे लोकार्पण,गोरक्षनाथ गड ऊर्जा देणारे तीर्थक्षेत्र-अक्षय कर्डीले 

६३ के व्ही डीपी,स्ट्रीट लाईटचे लोकार्पण,गोरक्षनाथ गड ऊर्जा देणारे तीर्थक्षेत्र-अक्षय कर्डीले




      नगर : दर्शक । 

तीर्थक्षेत्र गोरक्षनाथ गड येथे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या प्रयत्नातून ६३ केव्ही डीपी व  गडावर  स्ट्रीट लाईटचा लोकार्पण सोहळा भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते सप्पनं झाला. यावेळी महंत योगी रोहतास नाथमाजी सभापती बाजीराव गवारेउपसभापती रभाजी  सुळ






माजी सरपंच जालिंदर कदमसरपंच रूपालीताई कदम,देवस्थानचे अध्यक्ष जयराम कदम,सचिव गोरक्षनाथ कदम,  कैलास पठारे,  संतोष पठारे,  तुकाराम कदम,अर्जुन कदम,विश्वनाथ गुंड





सदाशिव कदमभागवत कदमचंदू कदमबापू बेरडइंद्रभान कदम,अक्षय कदममुरलीधर देठेइंद्रभान विरकर,एकनाथ विरकर,लक्ष्मण वीरकरभाऊ कदमयशवंत पानमळकर,वैशाली मतेराम पानमळकर आदी मान्यवर उपस्थित होते 


       गोरक्षनाथ गडाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पाच कोटी रुपयांचा विशेष निधी मिळवून विकास आराखडा तयार केला. या आराखड्यानुसाररस्ते विकासपाणीपुरवठा योजनाबागकामदेवस्थानाचे सुशोभीकरणतसेच ध्यानमंदिर आणि गोशाळेचा विस्तार या सर्व सुविधा उभारण्यात आल्या. त्याच विकासाच्या मालिकेत  गोरक्षनाथ गडावर आधुनिक एलईडी स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्या आणि विजेचा स्थिर पुरवठा व्हावा यासाठी ६३ केव्ही क्षमतेचा डीपी बसविण्यात आली.या प्रकल्पासाठी एकूण सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च झाला असुन गोरक्षनाथ गड भाविकांसाठी आदर्शप्रेरणाऊर्जा देणारे तीर्थक्षेत्र असल्याचे प्रतिपादन भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष  अक्षय कर्डिले यांनी केले.