गोरक्षनाथ गड व देवस्थान भारताच्या नकाशावर आहे-अक्षय कर्डीले
नगर : दर्शक ।
नगर तालुक्यातील गर्भगिरी पर्वत रांग हि नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून, हिरवाईने नटलेली आहे,येथील आदर्श गाव मांजरसुंबा हे शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर आहे.हे क्षेत्र धार्मिक व पर्यटन दृष्ट्या परिचित आहे तर येथील जंगली वनस्पती मुळे ते भारताच्या नकाशावर गेले आहे याच्या विकासासाठी आम्ही कायम बरोबर आहे असे प्रतिपादन भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले
श्रावण महिन्यात येथे लाखो भाविक आले होते व त्यांनी येथे भंडारा केला तर अक्षय दादा कर्डीले यांनी ३ वेळा गडास भेट देऊन पूजा केली यावेळी महंत योगी रोहतास नाथ, माजी सभापती बाजीराव गवारे, उपसभापती रभाजी सुळ, माजी सरपंच जालिंदर कदम, सरपंच रूपालीताई कदम, देवस्थानचे अध्यक्ष जयराम कदम, सचिव गोरक्षनाथ कदम, खजिनदार अॅड. मारुती कदम, तुकाराम कदम, भाऊसाहेब कदम, नारायण कदम, आसाराम कदम, भास्कर कदम, व्यवस्थापक विलास भुतकर कैलास पठारे, अर्जुन कदम, इंद्रभान कदम आदी मान्यवर उपस्थित होते
कर्डीले पुढे म्हणाले गोरक्षनाथ गडाला प्राचीन काळातील मोठा इतिहास असून याला ‘सोन्याचा डोंगर’ म्हणूनही संबोधले जाते. आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी गोरक्षनाथ गड देवस्थानच्या विकासासाठी आतापर्यंत मोठा निधी दिला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे. या ठिकाणी भव्य उद्यानाची निर्मिती, लाईट, पिण्याच्या पाण्याची सोय, पुरातन तलावाची दुरुस्ती, गोशाळा सुरू करून गावरान गाईंचे पालन केले जात आहे. तीर्थ क्षेत्राबरोबरच पर्यटन स्थळ म्हणून गडाची ओळख निर्माण झाली आहे.
सध्या गोरक्षनाथ गड परिसर संपूर्ण हिरवागार झाला असून छोटे बंधाऱ्यात पाणी साठले आहे, दुरून दिसणारा या गर्भगिरी डोंगरावरील मंदिर परि
हे ठिकाणी नगरचे हिल स्टेशन असून या ठिकाणी पावसाळ्यात धबधबे असतात.माळशेज सारखे वातावरण असते,ढग आपणास चिटकून जात आहे असे दिसते. तर पाऊस पडल्यावर धुके मोठ्या प्रमाणात असते.तर इतर वेळी शुद्ध हवा असते,थंड हवा असल्याने व सभोवेतालचा परिसर विलोभनीय दिसतो .येथे भाविकांबरोबर पावसाळ्यात पर्यटक आपल्या कुटूंबे, मित्र परिवार,ग्रुप बरोबर येतात व दिवसभर आनंद घेतात, देवाचे दर्शन घेऊन परिसराचा आनंद घेतात.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com