Nagar Bjp | महाराष्ट्रातील किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळ यादीत समावेश निम्मित भाजपा तर्फे फोटो प्रदर्शन
नगर : दर्शक ।
युनेस्कोने नुकतेच महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळ यादीत केला. याचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी सावेडी मंडलातर्फे एकूण १२ किल्ल्यांवरील छायाचित्रांचे प्रदर्शन माऊली सभागृह सावेडी या ठिकाणी आयोजित केले होते.
प्रदर्शनचे उदघाटन धनश्री विखे यांच्या हस्ते.यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते,सावेडीचे मंडलाध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे,उद्योजक के के शेट्टी, सचिव गोपाल वर्मा, छायाचित्रकार ठाकूरदास परदेशी,मनीषा बारस्कर-काळे,रेणुका करंदीकर ,प्रिया जानवे आदी उपस्थित होते.
भाजपा सावेडी मंडलाचे अध्यक्ष सीए ज्ञानेश्वर उर्फ राजेंद्र काळे यांच्या वतीने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
३५० वर्षानंतर शिवाजी महाराज आणि त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे सर्व किल्ले यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते. यामुळे जगामधील अनेक देशांना शिवाजी महाराजांचा पराक्रम नव्याने माहिती होणार आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, लोहगड, साल्हेर, खांदेरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग व तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
नगरमधील छायाचित्रकार ठाकूरदास परदेशी यांच्या नजरेतून विविध अंगांनी काढलेले हे फोटो लावण्यात आले होते . शिवप्रेमी नागरिकांनी हे प्रदर्शन पाहण्यास गर्दी केली होती .

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com