Nivedan | प्रेमदान हडको रेशन दुकान साठी अजित दादांना साकडे 

Nivedan |  प्रेमदान हडको रेशन दुकान साठी अजित दादांना साकडे




            नगर-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नगर मध्ये आले असता त्यांना राष्ट्रवादी ओबीसी विभागचे शहर जिल्हा अध्यक्ष अमित खामकर   प्रेमदान हडकोनवीन प्रेमदान हडको व परिसरातील नागरिकसावेडी यांनी प्रेमदान हडको रेशन दुकान साठी निवेदन दिले.


 



        निवेदनात म्हटले आहे कि  रेशन क्र.४१ हे रेशन दुकान आम्ही राहत असलेल्या जागेपासून २ कि.मी. आहे. त्यामुळे रेशन दुकानात माल आला कधी ते कळत नाही. धान्यासाठी २ कि.मी. पाईपिट करावी लागते. तसेच रेशन दुकाना जाताना नगर मनमाड रोड पार करावा लागतो.




 या कारणाने अनेक रहिवाशांचे अपघात झाले.काही अपगत्व प्राप्त झाले.काही मृत पावले.रेशन दुकान हे एक वेळेसच उघडत असल्याने आम्हाला कामधंदारोजदारी बुडवून धान्य आणण्यासाठी जावे लागते. इतक्या लांब पल्ला पार करेपर्यंत दुकान बंद झाल्याले असते. त्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.




          तरी आमच्या इथे अधिकृत संस्था कार्यरत आहेत. आमचा संस्थेला परवानगी दिल्यास नागरिकांचा वेळ व त्रास वाचेल व वेळेवर धान्य मिळेल.दादांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे