सर न्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

 डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यावर पिशव्या फेकण्यामागील सूत्रधार शोधा चर्मकार विकास  संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांची मागणी 







नगर : दर्शक | 
देशाच्या सर्वोच्य न्यायालायचे महामहिम सर न्यायाधिश बी.आर. गवई यांच्यावर जातीयवादी प्रवृत्तीच्या राकेश किशोर याने बूट फेकला. नगर मध्ये उड्डाण पुलावरून दोन प्लास्टिकच्या पिशव्या फेकून आक्षेपार्ह मजकूर लिहिलेली पत्रके टाकून पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला. 


 या दोन्ही प्रकरणी सखोल चौकशी करून बूट फेकणाऱ्या आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व पुतळ्याची विटंबना करून सामाजिक शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तीमागील खरा सूत्रधार शोधा अश्या दोन मागण्या महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी केल्या आहे. 



                  याबाबत त्यांनी संघाचे शिष्टमंडळ घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनाचा स्वीकार अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्ग यांनी केला. यावेळी त्यांच्या समवेत शहर जिल्हाध्यक्ष विनोद कांबळे, गणेश लव्हाळे, बाळासाहेब लव्हाळे, भिकाजी वाघ , अंकुश खरात, नागोराव म्हस्के, चांगदेव शेंडे, बाबुलाल शिंगरे, गजानन बागडे, ज्ञानदेव पाखरे, दिलीप तावरे, किसान बागडे हे होते. या निवेदनावर या सर्वांच्या तसेच विनायक केदारे, संतोष कांबळे, बाळू केदार, रावसाहेब देव्हारे, अशोक बनसोडे, भानुदास नन्नावरे, भगवान कळसकर, दिलीप कांबळे, दिलीप बोडखे, नवनाथ पोटे यांच्या सह्या आहेत. 



                 यात त्यांनी म्हंटले आहे कि हे बूट फेकल्याचे प्रकरण म्हणजे फक्त सरन्यायाधीशावर हल्ला नसून देशाचे सर्वोच्य स्थान न्याय मंदिर आणि संविधानावर हा बूट त्याने फेकला आहे. हल्ला करणारा राकेश किशोर हा उच्च्य शिक्षित वकील आहे. या प्रकाराचे परिणाम काय होतील हे राकेश किशोर याला चांगले ठाऊक आहे. तरी देखील त्याने हेतू पुरस्सर नियोजनबद्ध कट रचून हे कृत्य केले आहे. हे कृत्य करण्याची त्याची हिम्मतच कशी होते. या मागे कोण आहे. तसेच त्याच्या पाठीमागे कोणते षडयंत्र आहे. आणि ते कोणी रचले याचा शोध घ्यावा . तसेच त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 



                तसेच माळीवाडा मार्केट यार्ड येथील उड्डाणपुलावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ , महापुरुषाविषयी आक्षेपार्ह अपमानजनक मजकूर लिहिलेली पत्रके , दोन प्लास्टिक पिशव्यांतून फेकून पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला. यातील आरोपीला आपण शोधले आहे. त्याबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन व आभार ! परंतु सामाजिक शांतता भंग करणारा जातीय तणाव निर्माण करणारा हा प्रकार कोणी एकट्याने करण्याची हिम्मत कोणी दाखवू शकत नाही तर या मागचा सूत्रधार कोण आहे जो शहराचे वातावरण दूषित करण्याचा डाव टाकतो आहे. या सूत्रधाराचा शोध घेऊन त्यावर समाजद्रोहाचा गुन्हा दखल करावा अशी मागणी त्यांनी या निवेदनात केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या