Mukundnagar | सेफ स्टेप्स फाऊंडेशन तर्फे अमेरिकेतील तज्ञ डॉक्टरांचा व्हिडिओद्वारे परिसंवाद
Mukundnagar | नगर : दर्शक |
सेफ स्टेप्स् फाऊंडेशन ने नुकताच वृध्दत्वाकडे वाटचाल करणार्या भारतवासियांसमोर उभ्या असणारा धोका लक्षात घेऊन वयोवृध्दांना उठून बसण्यासाठी अथवा उभे राहण्यासाठी घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाय-योजना त्या वृध्दांची काळजी घेणार्या सांभाळणार्यांना प्रशिक्षण तसेच घरातील तत्संबंधी सुरक्षिततेच्या उपायांवर आधारीत अमेरिकेतील डॉ. श्रुती पटेल, (पी.टी., डि.पी.टी.) होम हेल्थ फिजिकल थेअरपिस्ट आणि सेफ फाऊंडेशनच्या सह-संस्थापक यांनी व्हिडीओद्वारे परिसंवादाचे आयोजन दि. 04 ऑक्टोबर 2025 रोजी ज्येष्ठ नागरीक संघ, मुकुंदनगर, अ.नगर येथे करणेत आले.
वृध्द व वृध्दत्वाकडे वाटचाल करणार्यांने उठून बसतांना / उभे राहतांना खाली पडणे ही अपघाताची बाब नव्हे ती पुर्वानुमान करता येणारी आणि टाळता येणारी गोष्ट आहे असे अमेरिकेतील फिजिकल थेरअपिस्टच्या डॉक्टर आणि सेफ स्टेप्स् फाऊंडेशनच्या सह-संस्थापक डॉ. ध्रुती पटेल यांनी सांगितले. त्या असेही म्हणाल्या की, साध्या आणि सोप्या उपायांद्वारे उदा. संतुलनाचे प्रशिक्षण, सुरक्षित घरगुती वातावरण आणि वृध्दांबी देखरेख करणार्यांच्या जागरूकतेमुळे आपण अशा वृध्द व्यक्तींना सुरक्षित व स्वालंबी ठेऊ शकतो.
उभे या व्हिडीओ परिसंवादामध्ये वृध्दांची देखरेख करणार्यांनी वयोवृध्दांना अधिक आत्मविश्वासाने कशी पाऊल उचलवित. संभाव्य धोके कसे टाळता येतील तसेच सुरूवातीच्या लक्षणाची ओळख कशा प्रकारे करता येतील. याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. जेव्हा आपल्या वयोवृध्द प्रियजनांना उठून बसतांना राहतांना तोल जाऊन पडल्याचा प्रसंग घडतो तेव्हा त्यांची काळजी घेणारे /देखरेख करणारे हतबल होतात. अशा गोष्टींवर मात करण्यासाठी वृध्दांची काळजी घेणार्यांना पुरेसे प्रशिक्षित करणे गरजेचे असून तत्संबंधीच्या उपाय योजना प्रामुख्याने करणे अत्यावश्यक आहे, असे ही त्या शेवटी म्हणाल्या.
भारतातील अनेक ज्येष्ठ नागरीकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे. काही ज्येष्ठ नागरीक निराधार अवस्थेत जीवन जगत आहेत. वृध्दापकाळात त्यांना विविध शारीरीक व्याधी जडलेल्या असतात. औषधोपचार घेण्यासाठी त्यांचेकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करीत नाही शिवाय केंद्र व राज्य शासनाने ज्येष्ठ नागरीकांसाठी योजना अपुर्या पडत आहे, अशा परिस्थित ’सेफ स्टेप्स् फाऊंडेशन’ इतर सेवाभावी संस्थेच्या मदतीने संपुर्ण भारत देशात सदरील उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन सेफ स्टेप्स् फाऊंडेशचे अध्यक्ष मजहर मिर्झा यांनी केले.
याप्रसंगी वयोवृध्दांच्या कुटुंबियांना वृध्दत्व अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि सन्मानजनक होईल, या दृष्टीने शिबीरातील उपस्थितांना ’सेफ स्टेप्स् फाऊंडेशन’ तर्फे व्यायाम-पत्रिकेचे, विना-मुल्य, वाटप करणेत आले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com