Nagar Sports | राज्य फुटबॉल संघाचे नेतृत्व श्री साई च्या जडणघडणी ने मिळाले- सुमैय्या शेख
विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुमैय्या शेख म्हटली की, माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज चा सिंहाचा वाटा आहे. या स्कूलमध्ये शालेय प्रवेश घेतला. तेव्हापासूनच मला खेळाची आवड निर्माण झाली. या स्कूलमध्ये शिकत असतानाच मला अक्षय नायडू व प्रसाद पाटोळे सर यांनी माझ्यामध्ये फुटबॉल खेळाडू दडला आहे याची जाणीव करून दिली.माझ्याकडून सतत फुटबॉलचा सराव करून घेतला.
माझ्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना व समाज व्यवस्थेचा विरोध होत असताना देखील माझ्या पाठीशी श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे सर व सर्व श्री साई परिवार तसेच माझे क्रीडा मार्गदर्शक मला सतत प्रोत्साहन व पाठिंबा देत राहिले.त्यामुळेच मला फुटबॉल क्षेत्रामध्ये करिअर करता आले.
आज राज्याचे नेतृत्व करत असताना मला श्री साई परिवाराचा विशेष अभिमान वाटतो.श्री साई इंग्लिश मिडियम च्या प्रांगणात झालेल्या सरावामुळे माझी जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या निवड चाचणीतून राणी कदम, तनिषा शिरसुल यांच्यासह क्रीडा प्रबोधिनी बालेवाडी साठी निवड झाली.मला आठ वेळा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत खेळता आले. इतकेच नव्हे तर मला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देखील सहा वेळा खेळण्याची संधी मिळाली.राणी कदम ला आदर्श मानून मी फुटबॉल खेळत आहे. राणी कदम नंतर मला 19 वर्षे वयोगटात राज्य फुटबॉल संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.
हिंदुस्तानी महिला लीग, नॅशनल बीचकर लीग, चॅम्पियनशिप सुपर कप, ड्युरंड कप यामधील काही लीगमध्ये मी खेळले आहे तर काही लीगमध्ये खेळणार आहे.आज मला स्कूलमध्ये बोलवून विशेष आदरा तिथ्य केले त्याबद्दल मी मनापासून संस्थेचे अध्यक्ष अशोक कानडे, उपाध्यक्ष नंदकिशोर भावसार , प्राचार्य तनुजा लोंढे, क्रीडा शिक्षक प्रसाद पाटोळे यांच्या सर्व शिक्षक वृंदांचे आभार व्यक्त करते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया मल्होत्रा मॅडम व आभार शरद दारकुंडे यांनी मांडले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com