Crime Nagar News | पाईपलाईन रोडवर दारूच्या नशेत बाईक चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल ; ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी
शहरातील पाईपलाईन रोडवरील भिस्तबाग चौकात मंगळवारी रात्री दारूच्या नशेत बाईक चालवणाऱ्या इसमावर तोफखाना पोलिसांनी कारवाई केली आहे. अत्यंत बेदरकार व निष्काळजी पद्धतीने वाहन चालवून सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण केल्याने संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव तेजस बाबासाहेब काकडे (वय 36, मूळ रा. डिग्रस, ता. राहुरी) असे आहे. या प्रकरणी पोलीस शिपाई संतोष शिवाजी मेसे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक मंगळवार दि. 7 ऑक्टोबर रोजी सायंकाळी भिस्तबाग चौकात नाकाबंदी करत असताना, रात्री 7.45 वाजता, तेजस काकडे हा (एम.एच. 17 ए. यु. 6133) दुचाकीवरून अत्यंत निष्काळजीपणे व झिगझॅग पद्धतीने वाहन चालवताना आढळून आला.
पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली असता, तोंडातून दारूचा उग्र वास येत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली असता, त्याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण आढळून आले. याप्रकरणी तेजस काकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार जे. एन. आव्हाड करीत आहेत.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com