New Arts College | कोणतीही भाषा अज्ञानाची नसते तर ज्ञानाची असते : डॉ. केशव देशमुख
New Arts College | नगर : दर्शक । येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयात अभिजात मराठी भाषा सप्ताहा निमित्त आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व न्यू आर्ट्स महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य डॉ. केशव देशमुख यांनी आपले विचार मांडले.
‘कोणतीही भाषा अज्ञानाची नसते तर ज्ञानाची असते त्यामुळे भाषा मरते तेव्हा केवळ भाषा मरत नाही तर देशही मरतो आणि संस्कृतीचाही दिवा विझतो. त्यामुळे आपल्या भाषेकडे आपण सजगपणे पाहण्याची आवश्यकता आहे’ अशी भूमिका मांडून त्यांनी मराठी भाषेतील समृध्द साहित्य परंपरेचा वेध घेतला.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे संपादकीय सहायक श्री. सागर कांबळे कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात विश्वकोशाची संकल्पना विशद करुन यातील ज्ञान सातत्याने अद्ययावत ठेवण्यासाठी नोंदलेखन कार्यशाळांचे आयोजन सातत्याने सुरु असते, आजच्या युवकांनी व अभ्यासकांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे यांनी केले तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे हे होते. पाहुण्यांचा परिचय डॉ. वैशाली भालसिंग यांनी करुन दिला. आभार प्रा. निलेश लंगोटे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मच्छिंद्र मालुंजकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी कवी प्रा. शशिकांत शिंदे, डॉ. बापू चंदनशिवे, डॉ. व्ही.एस. काळे, डॉ. नवनाथ येठेकर, डॉ. महेबूब सय्यद, प्रा. श्याम शिंदे, प्रा. गणेश भगत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन धोत्रे व मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com