सापडलेली सोन्याची अंगठी परत करून कृतीतून रुजवले प्रामाणिकतेचे मूल्यवर्धन

सापडलेली सोन्याची अंगठी परत करून कृतीतून रुजवले प्रामाणिकतेचे मूल्यवर्धन

सापडलेली सोन्याची अंगठी परत करून कृतीतून रुजवले प्रामाणिकतेचे मूल्यवर्धन



नगर : दर्शक । 

 महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी "मूल्यवर्धन प्रशिक्षण ३.०" च्या माध्यमातून अनेक मुलभूत व नैतिक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवावीत या हेतूने शिक्षकांचे प्रशिक्षण सध्या शहरात आनंदधाम परिसरातील एन. एम.सथा फार्मसी कॉलेज येथे पार पडले.या प्रशिक्षण व कॉलेज परिसरात भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे अध्यापक व अहिल्यानगर महानगरपालिकेचे पर्यावरण दूत सतिश गुगळे यांना किमान 4 ते 5 ग्रॅम सोन्याची अंगठी सापडली.



सतिश गुगळे सरांनी प्रामाणिकपणे ही बाब सुलभक श्री. गोरे सर यांना कळविली व प्रशिक्षण वर्गात एक वस्तू सापडली असून ज्याची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जावे असे जाहीर करताच सदर प्रशिक्षणात सहभागी असणाऱ्या मार्कंडेय विद्यालय श्रमिकनगरच्या महिला अध्यापिका श्रीमती जयश्री चिंतल यांनी माझी सोन्याची अंगठी हरवल्याचे सांगितले. 



वस्तूची ओळख पटल्याने सदर अंगठी सुलभक सौ. जोशी मॅडम व कोकाटे मॅडम यांच्या हस्ते शिक्षिका यांना सुपूर्द करताना त्यांच्या चेहऱ्यावरील विलक्षण आनंद पाहायला मिळाला.



 प्रशिक्षणा दरम्यान आत्मसात केलेली अनेक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजविताना किमान 40 ते 50 हजार रु. किमतीची ही सोन्याची अंगठी परत करून प्रामाणिकपणाचे एक कृतीयुक्त आदर्श उदाहरण सतिश गुगळे यांनी दाखवून दिल्याने त्यांचा अहिल्यानगर म.न.पा प्रशिक्षण समन्वयक अरुण पालवे यांच्या शुभहस्ते सर्व अध्यापकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.



यावेळी मनपा समन्वयक अरुण पालवे व अध्यक्ष तुळशीराम लबडे महाराज यांनी आपल्या मनोगतात सतिश गुगळे सरांचे भरभरून कौतुक केले.



सतिश गुगळे यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या