Nagar Sports | अजिंक्य शेवतेचा थायलंडमधील आंतरराष्ट्रीय एशिया चॅम्पियनशिपमध्ये चौथा क्रमांक

 Nagar Sports | अजिंक्य शेवतेचा थायलंडमधील आंतरराष्ट्रीय एशिया चॅम्पियनशिपमध्ये चौथा क्रमांक

Nagar Sports | नगर : दर्शक ।   खेलविश्वात अभिमानाचा क्षण ठरवत अहिल्यानगरचे सुपुत्र अजिंक्य अनिल शेवते याने थायलंड येथे नुकत्याच झालेल्या World Body Building and Physique Sports Federation तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत



 Nagar Sports | नगर : दर्शक । 

खेलविश्वात अभिमानाचा क्षण ठरवत अहिल्यानगरचे सुपुत्र अजिंक्य अनिल शेवते याने थायलंड येथे नुकत्याच झालेल्या World Body Building and Physique Sports Federation तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय एशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत 




मेन्स स्पोर्ट फिजिक 180 सेंटीमीटर वरील गटात भारतासाठी चौथा क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत जगभरातील नामांकित खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण व क्रीडा कौशल्याच्या जोरावर अजिंक्यने भारताचा आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा मान उंचावला आहे.




      या प्रभावी कामगिरीमुळे अजिंक्य शेवतेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख प्रतिभेला दिशा देणारे आदर्श उदाहरण ठरले आहे. शरीरसौष्ठव क्रीडा प्रकारात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक बळ मिळवून देण्याचा संकल्प अजिंक्यने व्यक्त केला आहे. त्यांच्या या यशामागे उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून आहारतज्ञ आणि राष्ट्रीय पंच श्री. सौरभ बल्लाळ यांचे प्रभावी प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले. तसेच Ahilyanagar Association of Bodybuilding and Physique Sports चे अध्यक्ष श्री. मयुर दरंदले व सचिव श्री. कैलास रणसिंग यांचे सहकार्य व प्रेरणादायी प्रोत्साहन मिळाले असल्याचे अजिंक्यने सांगितले.



     स्पर्धेतील उत्तुंग यशानंतर बोलताना अजिंक्य शेवते म्हणाले की, “हे यश माझ्या गुरूंचे मार्गदर्शन, कुटुंबीयांची साथ व नागरिकांचे आशीर्वाद यांच्यामुळे शक्य झाले. आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळवणे हे माझे पुढील लक्ष्य असून देशासाठी आणखी मोठ्या स्तरावर कामगिरी करण्याची जिद्द आहे.” जगभरातील मजबूत प्रतिस्पर्ध्यांमध्ये भारतीय तिरंगा झळकविणे हे अभिमानाचे क्षण असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले.



      क्रीडा तज्ञांच्या मते अजिंक्यची शारीरिक फिटनेस, मंचावरील पोझिंग स्किल्स, क्रीडाविषयक समज आणि स्वतःवरील काटेकोर नियंत्रण यामुळे त्याने स्पर्धेत आपले वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या या यशामुळे अहिल्यानगर मध्ये उत्साहाचे वातावरण असून क्रीडा व फिटनेस क्षेत्रात नव्या ऊर्जेला चालना मिळाली आहे. लवकरच त्यांच्या स्वागतासाठी भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


       अजिंक्य शेवतेच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल नागरिक, क्रीडाप्रेमी, प्रशिक्षकवर्ग तसेच विविध संघटनांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यातील स्पर्धांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या