Top News

विमानाने भव्य जगन्नाथ पुरी–ओडिशा तीर्थयात्रेचे आयोजन

 विमानाने भव्य जगन्नाथ पुरी–ओडिशा तीर्थयात्रेचे आयोजन

विमानाने भव्य जगन्नाथ पुरी–ओडिशा तीर्थयात्रेचे आयोजन





नगर : चारधाम पैकी एक अत्यंत महत्त्वाचे धाम असलेल्या जगन्नाथ पुरीसह ओडिशातील प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळांच्या दर्शनासाठी २० फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विमानाने विशेष तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा अहिल्यानगर–पुरी–अहिल्यानगर अशा मार्गाने संपन्न होणार असून भाविकांसाठी अत्यंत सोयीस्कर व नियोजनबद्ध स्वरूपात राबविण्यात येणार आहे.


या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे जगन्नाथ पुरी येथे विशेष दर्शनाची तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून भाविकांना भगवान जगन्नाथांचे शांत व सुलभ दर्शन घेता येणार आहे. भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या जगन्नाथ पुरीसह ओडिशातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गसंपन्न स्थळांचे दर्शन या यात्रेत घडणार आहे.


        यात्रेदरम्यान जगप्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर, ओडिशाची जीवनवाहिनी मानले जाणारे चिल्का सरोवर, भुवनेश्वर येथील लिंगराज मंदिर, पवित्र चंद्रभागा बीच, श्रद्धेचे केंद्र असलेले रामचंडी मंदिर, प्राचीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले चौषष्ठ योगिनी मंदिर, तसेच निसर्गरम्य नंदकानंद अभयारण्य यांसह आणखी अनेक धार्मिक व प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे.


      ही संपूर्ण यात्रा विमान प्रवासाद्वारे असल्याने वेळेची बचत होणार असून ज्येष्ठ नागरिक, महिला व कुटुंबांसाठी ही यात्रा अत्यंत आरामदायी ठरणार आहे. अनुभवी मार्गदर्शक, नियोजित दर्शन व्यवस्था आणि सुसूत्र कार्यक्रमामुळे भाविकांना अध्यात्मिक समाधानासह अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.


या पवित्र व आनंददायी यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्क : मो. ९४२२२२७९०६ – अभिजीत पोळ
मो. ७८७५५०००५६ – नंदकुमार पोळ

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने