स्वकुळ साळी ट्रस्टवर अनुजा कांबळे यांची निवड
नगर : दर्शक ।
येथील स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ च्या ट्रस्टवर संलग्न समिती समितीवर अनुजा कांबळे यांची निवड करण्यात आली तसे पत्र विश्वस्त प्रमुख श्री विक्रम पाठक यांनी दिले यावेळी सेक्रेटरी श्री विजय मानकर विश्वस्त श्री संजय सागावकर उपस्थित होते मंडळाच्या सर्व विश्वस्त आणि कार्यकारणी सदस्यांनी अनुजा कांबळे यांना अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
ट्रस्टच्या माध्यमातून अनुजा कांबळे यांनी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवले आहे त्यामुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच लवकरच हितसंवर्धक मंडळाच्या अंतर्गत सर्व महिला चे मंडळ तयार करण्यात येऊन महिलांचे बचत गट, सहकारी संस्था व विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती विक्रम पाठक यांनी दिली.
अनुजा कांबळे या अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी महिला मंडळाच्या कार्यकारिणी सदस्या व ब्युटिशियन असून मराठी फिल्म इंडस्ट्रीत फिल्म मेकअप आर्टिस्ट व हेअर स्टायलिस्ट चे काम करत असून त्याच बरोबर त्या नाटक,शॉर्टफिल्म चे काम काम करतात तसेच त्यानी अनेक फिल्म मध्ये रोल हि केले आहेत तसेच त्या जिल्हा ब्युटिशियन असो च्या व प्रतिबिब संस्थेच्या अध्यक्षा आहेत.
.webp)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com