Dr.Vikhe Patil College | डॉ.विखे पाटील अभियांत्रिकीत जलसंधारण विषयावर अखिल भारतीय सेमिनार संपन्न
Dr.Vikhe Patil College | नगर : दर्शक ।
जलसंधारण ही केवळ सरकारी योजना नसून ती लोकसहभागातून उभी राहणारी चळवळ आहे. पाणी अडवा–पाणी जिरवा, कंटूर बंडिंग, शेततळे, वृक्षलागवड व भूजल पुनर्भरण यांसारख्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी केली, तर दुष्काळग्रस्त भागही समृद्ध होऊ शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार विजेते व आदर्श गाव संकल्पनेचे प्रणेते पोपटराव पवार यांनी केले. लोकसहभाग, पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शाश्वत शेती पद्धती आणि युवकांचे नेतृत्व या घटकांवर भर दिल्यास जलसंधारण कार्यक्रम दीर्घकालीन यशस्वी ठरतात, असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्पष्ट केले.
अहिल्यानगर येथील विळद घाट मधील डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी विद्यालयात द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), अहिल्यानगर लोकल सेंटर यांच्या वतीने आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या सहकार्याने “वॉटरशेड डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट प्रोग्राम्स : मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन” या विषयावर अखिल भारतीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले. सेमिनारचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता नोंदणी प्रक्रियेसह झाली. डॉ.पी.एस.गायके आणि इंजि.ए.के.राजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तसेच डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख पाहुणे अॅड. वसंत कापरे यांनी जलव्यवस्थापनाच्या गरजेवर भाष्य करताना तंत्रज्ञानाधारित निरीक्षण व मूल्यमापन प्रणालींचे महत्त्व अधोरेखित केले. सन्माननीय अतिथी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.के.खरचे, मॉडेल व्हिलेज प्रोग्राम चे संचालक पद्मश्री पोपटराव पवार, डॉ.व्ही.पी.सिंग (डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर एमेरिटस, Texas A&M University, अमेरिका) आदी उपस्थित होते. त्यांनी जलव्यवस्थापनातील संशोधन, लोकसहभाग आणि आंतरराष्ट्रीय अनुभव यावर मार्गदर्शन केले.
बीबीबीकार्यक्रमात इंजि.बी.पी.भगवत (अध्यक्ष, आयईआय–एएलसी) यांनी आयईआय विषयी माहिती दिली.डॉ.ए.ए.अत्रे (संयोजक) यांनी सेमिनारच्या उद्दिष्टांची माहिती दिली. सूत्रसंचालनात डॉ.व्ही. पी.सिंग व डॉ.व्ही.के.खरचे यांची ओळख करून देण्यात आली त्यांनी देखील मार्गदर्शनपर भाषणे केली.
सेमिनारच्या आयोजनासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.राऊत, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.नवथर, आयोजक सचिव डॉ.व्ही.एन.बाराई, सहसंयोजक डॉ.एस.बी.नंदगुडे, संयोजक डॉ.ए.ए.अत्रे, आईआय एएलसी चे मानद सचिव डॉ.डी.ए.विधाते, आयईआय एएलसी चे अध्यक्ष बी.पी.भगवत, इंजि.ए.के.राजे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.व्ही. एन.बाराई यांनी आभार प्रदर्शन केले.राष्ट्रगीताने उद्घाटन समारंभाची सांगता झाली. त्यानंतर मुख्य सत्रात जलसंधारण विषयावर विशेष व्याख्याने पार पडली. देशभरातील प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलसंधारण व शाश्वत विकासाच्या दृष्टीने हा सेमिनार मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे तांत्रिक संचालक इंजि.एस.के. कल्हापुरे, महासचिव डॉ.पी.एम.गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. फाउंडेशनचे चेअरमन नामदार तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सेमिनारचे विशेष कौतुक केले.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com