Top News

डोंगरगणची शाळा भरणार आता थेट चंद्रावर ...!!

 नासाच्या आर्टेमिस -2 मोहिमेच्या ओरियन यानासोबत जाणार विद्यार्थी आणि शाळेच्या नावाचे एस डी कार्ड चंद्रावर

डोंगरगणची शाळा भरणार आता थेट चंद्रावर ...!!





          
नगर : दर्शक । 

नगर तालुक्यातील डोंगरगण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 39 विद्यार्थी व दोन शिक्षकांची नावे थेट चंद्रावर पाठवली जाणार आहेत. ’नासा’ या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या ’आर्टेमिस-2’ मोहिमेत त्यांचा ऐतिहासिक सहभाग नोंदवला जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पास ’नासा’कडून देण्यात आले आहे. हा क्षण शाळेसाठी अभिमानास्पद ठरत आहे. या मोहिमेत व्हर्चुअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आवाहन केले होते. 




या उपक्रमात नासाकडून केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून डोंगरगण शाळेने नोंदणी केली होती. यशस्वीरित्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर नासाकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे बोर्डिंग पास पाठवण्यात आले. या बोर्डिंग पासचे वितरण आज शाळेत विद्यार्थ्यांना करण्यात आले. त्यांना मोहिमेचे प्रक्षेपण ही व्हच्र्युअली पाहता येणार आहे. या विद्यार्थ्यांची नावे एका एसडी कार्ड मध्ये संग्रहित करून ओरियन यानाद्वारे चंद्राकडे पाठवली जाणार आहेत.




             निखिल कदम, युवा गायकवाड, आरूष चांदणे या प्रवेश पात्र विद्यार्थ्यांसह प्रिया कदम, काव्या चांदणे, शंभू चांदणे, सार्थक गायकवाड, ममता दळे, रुचिता कदम, संग्राम चांदणे, सम्राट चांदणे, चैतन्य चांदणे, प्रशांत चांदणे, सोहम कदम, श्रेयस शिरसाठ, देव ठोंबे, मयूर आहेर, श्रावणी चांदणे, आरोही चांदणे, आकांक्षा चांदणे, अक्षरा चांदणे, रिहा पठाण, आरुषी चांदणे, प्रिया गोलवड, श्रावणी भांबळ, आयुष चांदणे, अजय शिरसाठ, श्रीनाथ हिलगुडे, अनुष्का हिलगुडे, श्रुती भांबळ, अक्षदा दळवी, अथर्व चांदणे, अक्षद शिरसाठ. जय शिरसाठ, रुद्र ठोंबे, समर्थ चांदणे, समर्थ कदम, शुभम दळे, साईनाथ पवार, राजु पवार, कृष्णा बर्डे या विद्यार्थ्यांचे व शिक्षक नारायण मंगलारम आणि ज्ञानेश्‍वर चेडे यांच्यासह यावेळी शाळेचा ही बोर्डिंग पास विद्यार्थ्यांच्या हाती देण्यात आला.







               या उपक्रमामागे शाळेतील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण मंगलारम यांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठीची धडपड दिसून येते.  विद्यार्थ्यांना या बाल वयात अंतराळ मोहीम, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक , अंतराळवीर यांची माहिती व्हावी, त्यांच्या डोळ्यात स्वप्ने पेरली जावीत म्हणून आम्ही हा उपक्रम आयोजित केला होता  असे बोर्डिंग पास वितरण वेळी मंगलारम म्हणाले, तर आर्टेमिस मोहिमेची समग्र माहिती, अंतराळात गुरुत्वाकर्षण विरहित वातावरणात अंतराळवीर कसे राहतात, कसे खातात, झोपतात, हे सर्व विद्यार्थ्यांना माहित व्हावे म्हणून आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिल्याचे उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्‍वर चेडे म्हणाले. 



आर्टमिस-2’ ही मोहीम एप्रिल 2026 पूर्वी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे समारे 6 लाख 85 हजार मैल प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत. याची माहिती जगभरातील सर्वसामान्य जनतेला व्हावी साठी नासाने हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाबद्दल शिक्षणधिकारी भास्कर पाटील व नगरच्या गटशिक्षणाधिकारी  तृप्ती कोलते, विस्तार अधिकारी संजय बोबडे, केंद्रप्रमुख बाबागोसावी डोंगरगण शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतक केले आहे.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने