मुस्लिम वधुवर (रिश्ता) मेळाव्याचे नगर मध्ये १२ फेब्रुवारी रोजी भव्य आयोजन

मुस्लिम वधुवर (रिश्ता) मेळाव्याचे नगर मध्ये १२ फेब्रुवारी रोजी भव्य आयोजन







नगर : दर्शक । 
नगर शहरात विवाह इच्छुकांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध होत असून गुरुवार दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकदिवसीय भव्य मुस्लिम वधुवर रिश्ता मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे रहमत सुलतान मॅरेज ब्युरोचे आरिफ सय्यद यांनी सांगितले.



हा मेळावा सर्व मुस्लिम बिरादरीतील नागरिकांसाठी खुला व मोफत असून विवाहासाठी योग्य स्थळ शोधणाऱ्या कुटुंबांना एकाच ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.



या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या विवाहयोग्य मुला-मुलींचे फोटो व बायोडाटा पाहण्याची सुविधा उपलब्ध असेल. डॉक्टर, इंजिनियर, सुशिक्षित तसेच कमी शिक्षित, अविवाहित, घटस्फोटित, विधवा-विधुर अशा सर्व प्रकारच्या रिश्‍त्यांची माहिती येथे मोफत पाहायला मिळणार आहे असे युनूस तांबटकर यांनी सांगितले.



या वधू-वर परिचय मेळाव्यासाठी येणाऱ्या पालकांनी आपल्याकडील मुला-मुलींचे फोटो व बायोडाटा सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुकांना आपल्या पसंतीनुसार योग्य रिश्ता शोधण्याची संधी मिळणार असून त्यामुळे विवाह जुळविण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचे शफकत सय्यद यांनी सांगितले.



या मेळाव्यासाठी प्रवेश पूर्णतः मोफत आहे. मात्र ज्या व्यक्तीकडे फोटो बायोडाटा असेल त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. मेळाव्यानंतर घरी बसून पुढील संपर्कासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.



विवाह इच्छुक कुटुंबांनी या संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी ‪75178 60786‬ व 98506 87868  यानंबरवर संपर्क करावे असे आवाहन आबीद दुलेखान यांनी केले आहे.